Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तारगाव फाट्यावरील रखडलेले रस्त्याचे काम पुन्हा सुरू

मसूर / वार्ताहर : लहान-मोठ्या अपघाताचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या कराड-कोरेगाव रस्त्यावरील तारगाव फाटा हे ठिकाण मसूरपासून साधारण पाच किलोम

सातार्‍यातील जिल्हा कारागृहातील कैद्यांमध्ये हाणामारी
कुंपण हटविल्याने कास पठारावर येणार फुलांना बहर; आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश
दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी l DAINIK LOKMNTHAN

मसूर / वार्ताहर : लहान-मोठ्या अपघाताचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या कराड-कोरेगाव रस्त्यावरील तारगाव फाटा हे ठिकाण मसूरपासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर डोंगर उत्तरालगत आहे. खराडे, तारगाव, कोरेगाव आणि कराड या चारही बाजूला जाणार्‍या येणार्‍या वाहनांची वर्दळ असलेला हा चौक आहे. चौकालगत आरफळ कॅनलचा अरुंद पूल, फाट्यावरील बस स्टॉप आणि छोट्या मोठ्या व्यवसायिकांची खोकी यामुळे येथे लोकांची वर्दळ सतत असते. उसाचा गळीत हंगाम सुरू झाला की उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी होण्याच्या घटना येथे सतत घडत असतात. काहीजणांनी येथे प्राणही गमावलेले आहेत. वारंवार घडणार्‍या अपघातांची मालिका, प्रवाशांची आणि स्थानिक ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून चौकाच्या रुंदीकरणाच्या कामाला गती मिळाली होती. साधारण 50 ते 60 टक्के पेक्षा जास्त चौकाचे काम ही पूर्ण झाले होते. त्यामध्ये चौकातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला 390 मीटर लांबीच्या चौपदरीकरणाचे काम झाले आहे. खराडे आणि पाडळीच्या बाजूकडील 200 मीटरचे रस्त्याचे काम झाले आहे. कालगावकडे जाणार्‍या रस्त्याची रुंदी दहा मीटरने वाढविण्यात आली आहे. मात्र, वळणावरील कॅनलच्या पुलाचे रुंदीकरनाचे मुख्य काम रखडले होते. गेल्या चार-पाच महिन्यापासून सदरचे काम पूर्णपणे बंद अवस्थेत होते. यामुळे प्रवाशांना अनेक समस्या निर्माण होत होत्या. परंतू गेल्या चार ते पाच दिवसापासून दुरुस्तीचे काम अतिशय वेगात सुरू असून, बर्‍यापैकी काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आता या चौकाला भारदस्त अशा रुंदीकरणामुळे वेगळेच स्वरूप निर्माण झाले आहे. व्यापार्‍यांची ही गर्दी होऊ लागली आहे. यामुळे येणार्‍या-जाणार्‍यातून लोकांनी समाधान व्यक्त केले.

COMMENTS