भाजपला शह देण्यासाठी विविध पक्षांनी एकत्र येत भाजपला शह देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र इंडिया आघाडीच्या स्थापनेपासून या आघा
भाजपला शह देण्यासाठी विविध पक्षांनी एकत्र येत भाजपला शह देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र इंडिया आघाडीच्या स्थापनेपासून या आघाडीत मोठ्या प्रमाणावर विसंवाद दिसून येत आहे. खरंतर इंडिया आघाडीसाठी मोठ्या प्रमाणावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुढाकार घेतला. अर्थात या दोन्ही नेत्यांनी पुढाकार घेण्याचे प्रमुख कारण म्हणजे इंडिया आघाडीची सत्ता आल्यास आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार असू असेच या नेत्यांना वाटत होते. मात्र इंडिया आघाडीचे संयोजकपद नाकारून नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा कोलाटंउडी घेत एनडीएसोबत जाणे पसंद केले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र लढल्या, त्यानंतर राजधानीत आपने देखील विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहे, असे असतांना काँगे्रसकडून आपवर जहरी टीका करण्यात येत आहे. त्यावरून आप आणि काँगे्रसमध्ये वादाची ठिणगी पडली असून, आपने चक्क काँगे्रसला बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. याला निमित्त ठरले काँगे्रस नेते अजन माकन. त्यांनी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही आणि आपच्या सरकारला जनतेची फसवणूक करणारे सरकार म्हटल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. खरंतर आपने स्वबळावर नारा दिल्यानंतर काँगे्रस कठोर टीका करणार असे ग्रहित धरायलाच हवे. जर काँगे्रस आणि आपची आघाडी असती तर, ही टीका केली असती तर तो वेगळा भाग होता. मात्र स्वबळावर लढत असतांना आप आपला प्रतिस्पर्धी भाजपला मानतो, तर दुसरीकडे दिल्लीत आपची सत्ता असल्यामुळे काँगे्रसने आपला साहजिकच टार्गेट करणे योग्य आहे. असे असतांना आपने काँगे्रसकडून मैत्रीची अपेक्षा करणे चूक आहे. खरंतर इंडिया आघाडीतील पक्ष खरंच समन्वयाची भूमिका घेत आहेत का? हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण लोकसभा निवडणुकीत पाहिले तर, आपने पंजाबमध्ये लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवली, तर तिथे काँगे्रसने आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले, पश्चिम बंगालमध्ये देखील तेच. काँगे्रसने स्वतंत्र तर तृणमूल काँगे्रसने स्वतंत्र उमेदवार उभे केले. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये यायचे आणि आपले गड सांभाळण्यासाठी स्वतंत्र लढायचे अशीच रणनीती इंडिया आघाडीतील मित्रपक्षांची दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गट देखील मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनी एक अचूक असा संदेश पसरविला आहे की, काँगे्रस सोबत असल्यास यश मिळत नाही, त्यापेक्षा स्वबळावर लढल्यास अधिक यश मिळते, असा संकेत इंडिया आघाडीतील रूढ करू पाहत आहे. ममता बॅनर्जी यांनी देखील काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याचे वक्तव्य केले होते. खरंतर इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधींकडे नको असाच सूर या पक्षांचा दिसून येत आहे. वास्तविक पाहता, या पक्षांची ध्येयधोरणे एक असल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे यांच्यात विसंवाद असल्याचे दिसून येत आहे, यातूनच ही सत्तेची मारामारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता इंडिया आघाडीला ताकदवर बनवण्याची इच्छाच या पक्षांची दिसून येत नाही. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला चांगले यश मिळाले, मात्र काही राज्यात स्वतंत्र लढल्यामुळे तितके म्हणावे तस यश मिळवता आले नाही. त्यातच नितीशकुमार यांनी कोलांटउडी मारल्यामुळे एनडीएला सत्ता स्थापन करणे सोपे झाले आहे. मात्र याचे भान इंडिया आघाडीतील पक्षांना नाही. त्यामुळे दिल्लीत आप आणि काँगे्रसमध्ये वादाची ठिणगी पडली असून, हा वाद निवडणुकीच्या टप्प्यात वाढण्याची शक्यता आहे. कारण आप दिल्ली हातातून जावू नये, यासाठी कसोशीने प्रयत्न करतांना दिसून येत आहे. तसेच निवडणुकीचा बिगुल वाजल्यास इंडिया आघाडीतील पक्षातील नेते केजरीवाल यांच्या आपच्या व्यासपीठावर दिसू शकतात, तसेच काँगे्रसचे व्यासपीठ टाळू शकतात. जर दिल्लीतून आपचे सरकार कोसळले तर, आपमागे चौकशीचा मोठा ससेमिरा लागू शकतो, अनेक चौकशा होवू शकतात, अनेक नेत्यांना तुरूंगवारी होवू शकते, याची जाणीव आपच्या नेत्यांना आहे.
COMMENTS