बीड : नुकताच आदिक मास महिना सुरू झाला आहे, त्यामुुळे जावयांना अधिक महत्व प्राप्त होत आहे. धोंड्याचा महिन्यात जावयांचा चांगलाच पाहुणचार करण्याची प
बीड : नुकताच आदिक मास महिना सुरू झाला आहे, त्यामुुळे जावयांना अधिक महत्व प्राप्त होत आहे. धोंड्याचा महिन्यात जावयांचा चांगलाच पाहुणचार करण्याची पद्धत असतांना, बीडमध्ये मात्र एका जावयाला सासुरवाडीत बोलावून चांगलेच बदडल्याची घटना समोर आली आहे. नवरा बायकोचे भांडण झाल्यावर मुलगी आजारी असल्याचे सांगत सासरच्या मंडळींनी जाव्याला घरी बोलावले. जावई घरी येताच सासरच्या मंडळींनी त्याला येथेच्छ बदडल्याची घटना बीड जिल्ह्यातील औरंगपूर येथे घडली.
या घटनेनंतर जावयाने पोलिस ठाणे गाठत दिलेल्या तक्रारीनुदार सासू, सासरे, पत्नी, आणि मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. सासरे बाळू तुकाराम जोगदंड, सासू मालन जोगदंड आणि पत्नी प्रगती सोनपारखे आणि मेहुणा संजय जोगदंड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जावई अमित सोनपाखरे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावई अमित सोनपाखरे आणि त्यांची पत्नी प्रगती सोनपाखरे यांच्यात वाद झाले होते. दरम्यान, ती यानंतर माहेरी गेली. काही दिवसांनी मुलगी आजारी असल्याचे कारण देऊन त्यांनी पती प्रगती हिने अमित सोनपाखरेला घरी बोलावून घेतले. मुलीगी आजारी असल्याची माहिती मिळताच अमित हा 13 जुलै रोजी बीड येथील औरंगपूर येथे सासुरवाडीत गेला. यावेळी अमितच्या चुलत्यांनी फोन करून प्रगती हिच्याशी बोलायचे आहे असे सांगितले. मात्र, प्रगतीने बोलण्यास नकार दिला. यावेळी सासरे आणि अमितच्या चुलत्यात फोन वरुन वाद झाले. तर औरंगपूरला आलेल्या अमित यांचे सासर्यासोबत वाद झाला. दरम्यान, यावरून जावई अमित आणि सासरे संजय जोगदंड यांच्यात वाद झाला. सासर्याने मुलगा घरी बोलावले. यावेळी दोघांनी मिळून अमितला पट्ट्याने आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. यात अमित गंभीर जखमी झाला. यानंतर त्याने तेथून कसा बसा पल काढला. दरम्यान, जखमी झालेल्या अमितला त्याच्या भावांनी आंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण रुग्णालय दाखल केले. येथून उपचार करून अमित सोनपारखरे हा घरी केल्यावर त्याने सासू, सासरे, मेहुणा आणि पत्नीविरोधात युसूफवडगाव पोलिसांत तक्रार दिली. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
COMMENTS