द सेवा मंडळाच्या सेवक प्रतिनिधी निवडणुकीत प्रगती पॅनलची बाजी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

द सेवा मंडळाच्या सेवक प्रतिनिधी निवडणुकीत प्रगती पॅनलची बाजी

अहमदनगर : शैक्षणिक क्षेत्रात जिल्ह्यात कार्यरत असलेल्या हिंद सेवा मंडळ या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणुक बिनविरोध झाल्यानंतर सेवक प्रतिनिधी हिंद

सरपंच-उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य हे शासनाचे नोकर नाही
कर्जतमध्ये रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्तीचा थरार!
भगवान शिवाच्या रुद्राक्षाचा महिमा अगाध ः समाधान महाराज शर्मा

अहमदनगर : शैक्षणिक क्षेत्रात जिल्ह्यात कार्यरत असलेल्या हिंद सेवा मंडळ या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणुक बिनविरोध झाल्यानंतर सेवक प्रतिनिधी हिंद सेवा मंडळ सेवक प्रतिनिधींच्या निवडणूक मध्येही प्रगती पॅनलने बाजी मारली आहे. या निवडणुकीत प्रगती पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले आहेत. संस्थेच्या सेवक प्रतिनिधींच्या 6 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी ३० मे रोजी पेमराज सारडा महाविद्यालयात झाली. या निवडणुकीत प्रगती पॅनलचे निवडून आलेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी, विठ्ठल उरमुडे (२८५), आदिनाथ जोशी (२८६), योगेश देशमुख (२७८), गिरीश पाखरे (२७९), कल्याण लकडे (२७८), व सुनील सुसरे (२६९). हिंद सेवा मंडळाचे नूतन अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, माजी कार्याध्यक्ष अजित बोरा, संचालक डॉ.पारस कोठारी, सुमतीलाल कोठारी आदींनी नवनिर्वाचित शिक्षक प्रतिनिधींचे अभिनंदन केले. ढोल वाजवून व फटके फोडून यावेळी विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पेमराज सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे, प्रबंधक अशोक असेरी, अधिक जोशी, सचिन मुळे व नवनाथ जंगले आदी उपस्थित होते.

COMMENTS