Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा शहरात दुकाने फोडण्याची मालिका सुरूच

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात आज दिनांक 29 जुन पहाटे चार ते सााडेचा दरम्यान श्रीगोंदा शहरातील एसटी स्टँड परिसरात, वर्दळीच्या ठिकाणी पाच ते सात दुका

हनुमान जयंतीनिमित्त आज महाप्रसादाचे आयोजन
कोळगाव थडी सोसायटीच्या व्हा.चेअरमनपदी गणेश पानगव्हाणे
पंचनामा नको नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या- शीला खेडकर

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात आज दिनांक 29 जुन पहाटे चार ते सााडेचा दरम्यान श्रीगोंदा शहरातील एसटी स्टँड परिसरात, वर्दळीच्या ठिकाणी पाच ते सात दुकानांचे शटर तोडुन चोरी झाल्याने श्रीगोंदा शहरात खळबळ उडाली आहे. श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळाची  पाहणी केली असता ठसे तज्ञ पाचरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
श्रेया मोबाईल, जीके केक, श्रावणी मोबाईल, आणि वैभव हॉटेल या दुकानांची शटर तोडून चोरांनी आत प्रवेश करत मोबाईल व रोख रक्कम लंपास केले आहे. शेजारी असलेल्या सिद्धेश्‍वर मोबाईल व ग्राहक सेवा केंद्रातही चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या चोरीमध्ये दुकान मालक मोरे, संपत खराडे, गुलाब गुप्ता, आणि वैभव खंडके यांचे नुकसान झाले आहे. जीके केक येथून चार केक आणि आठशे रुपये रोख, श्रावणी मोबाईलमधून 25 ते 30 जुने-नवीन अँड्रॉइड मोबाईल, तसेच वैभव हॉटेलमधून 30 ते 32 हजार रुपये रोख चोरी झाल्याचे दुकानदारांनी सांगितले. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलिस करीत आहेत.

चोरट्यांना शोधण्यात पोलिस यंत्रणा अपयशी – सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरांचा चेहरा पूर्णपणे दिसत आहेत. यापूर्वीही अशाच प्रकारे शटर तोडून चोर्‍या करतानाचे फुटेज पोलिसांना दिले आहेत, तरीही पोलिसांना चोर का सापडत नाहीत. यामागे पोलिसांचे चोरांशी काही आर्थिक संबंध आहेत का? अशी चर्चा नागरिक करत आहेत.

COMMENTS