Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा दुसरा सीझन लवकरच येणार ?

मुंबई प्रतिनिधी - झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. पण प्रेक्षक आजही या मालिकेला यातील कलाकारांना मिस क

विकासांच्या मुद्दयांना बगल
अकोले बस स्थानकात प्रवासी दिन उत्साहात
खरा न्याय जनतेच्या दरबारातच …

मुंबई प्रतिनिधी – झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. पण प्रेक्षक आजही या मालिकेला यातील कलाकारांना मिस करताना दिसतात. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, मायरा वायकुळ या कलाकारांनी त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. ही कलाकार मंडळी पुन्हा एकदा एकत्र यावीत अशी प्रेक्षकांची ईच्छा आहे. त्यासाठी माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचा दुसरा भाग यावा अशी मागणी प्रेक्षक करत आहेत. यावर नुकतीच अभिनेता श्रेयस तळपदेने एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे लवकरच ही मालिका पुन्हा नव्याने भेटीला येणार का, याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. संकर्षण, प्रार्थना, श्रेयस आणि मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर या चौघांनी एकत्र प्रोजेक्ट करणार असल्याचे जाहीर केले होते. पण तो नवा प्रोजेक्ट काय असेल हे त्यांनी गुपित ठेवलेले होते. त्यानंतर ही सगळी टीम आपापल्या कामाला लागली. इकबाल चित्रपटानंतर श्रेयस तळपदे आणि प्रतीक्षा लोणकर आगामी चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त पुन्हा एकत्र आली

COMMENTS