मुंबई/प्रतिनिधी ः भाजपविरोधात मोट बांधण्यासाठी आज गुरूवारी मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपविरोधी लढ्याचा राष्ट्रीय कार्य
मुंबई/प्रतिनिधी ः भाजपविरोधात मोट बांधण्यासाठी आज गुरूवारी मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपविरोधी लढ्याचा राष्ट्रीय कार्यक्रम ठरवण्यात येणार असल्यामुळे या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. याच बैठकीत इंडिया आघाडी भाजपविरोधात एल्गार पुकारणार असून, पुढील धोरणांना दिशा देणार आहे.
पाटणा व बंगळुरूनंतर इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक असून या बैठकीत लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएचा पराभव करण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम ठरवला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे अवघ्या देशाचे लक्ष असणार आहे. सांताक्रुझच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी होणार्या या बैठकीसाठी विरोधी पक्षातील नेते मुंबईत येण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत दाखल झाल्या आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीला देशातील 26 पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच, त्यांच्या जेवणातही अस्सल मराठमोळ्या खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. 31 ऑगस्ट रोजी बैठकीच्या पहिल्या दिवशी आघाडीतील पक्षांच्या नेत्यांचे मुंबईत आगमन होईल. त्या दिवशी ग्रॅण्ड हयातमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. देशपातळीवरील नेते येणार असले तरी त्यांच्या ताटात महाराष्ट्राच्या विविध भागांतील पारंपरिक पदार्थांचा समावेश असणार आहे.
मायावतींचा मात्र स्वबळाचा नारा – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील सर्व प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी अनेक पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. मायावतींच्या नेतृत्त्वाखालील बहुजन समाज पक्ष भारत आघाडीत सामील होणार असल्याची अटकळ बांधली जात होती. मायावतींनी अशा चर्चांना पूर्णविराम लावला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचा इशारा मायावतींनी दिला आहे. तसेच देशातील एनडीए आणि इंडिया दोन्ही आघाडी गरीबविरोधी आणि जातिवादी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मायावती यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, एनडीए आणि इंडिया या दोन्हीही आघाडी गरीबविरोधी, जातीयवादी आणि भांडवलशाही धोरणांवर चालणारे पक्ष असल्याची टीका आहे.
COMMENTS