Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गंगा मंदिर परिसरातील रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे ः  अ‍ॅड. नितीन पोळ

कोपरगाव तालुका ः बेट नाका ते पुणतांबा फाटा पर्यंतच्या रस्त्याचे काम अनेक दिवसापासून सूरू आहे. मात्र आगामी काळात नव रात्र उत्सव जुनी गंगा मंदिर येथे म

शरसंधान ! एसपी साहेब, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहात ‘का’? l पहा LokNews24
Sangamner : खड्ड्यांमध्ये शिवप्रतिष्ठाणचे वृक्षलागवड आंदोलन
दादा पाटील महाविद्यालयात गुणवंत कलाकारांचा सन्मान 

कोपरगाव तालुका ः बेट नाका ते पुणतांबा फाटा पर्यंतच्या रस्त्याचे काम अनेक दिवसापासून सूरू आहे. मात्र आगामी काळात नव रात्र उत्सव जुनी गंगा मंदिर येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्यामुळे उत्सव काळापूर्वी या रस्त्याचे काँक्रीटिकरन त्वरित पुर्ण करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष ड नितीन पोळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, पुढील महिन्यांत नव रात्र उत्सव पर्व सुरू होणार आहे. सद्या कोपरगाव ते शिर्डी या रस्त्याचे काँक्रीटीकरण काम सूरू आहे अत्यंत रहदारीचा रस्ता आहे. या कामाची सुरुवात अर्थात भूमिपूजन साई बाबा तपोभूमी पासुन झाले. पुणतांबा फाटा ते सावळी विहिर फाटा रस्त्याचे एका बाजूचे पाच सहा किलो मिटर अंतराचे काँक्रीटीकरण काम पुर्ण झाले मात्र गोदावरी नदीवरील मोठा पूल ते बेट नाका काम अद्याप सूरू आहे तर बेट नाका येथे पूल बांधून एक वर्ष झाले तरी त्या पुलाच्या आजूबाजूने वाहन चालकांना कसरत करत गाडी न्यावी लागते. बेट नाका ते कातकडे पेट्रोल पंप या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. तेथून पुढे रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे त्यामुळे तो रस्ता वाहतुकीस खुला करण्यात यावा. तसेच कोपरगाव शहरातून मोहिनी नगर भागातून जाणारा नगर पालिका हद्दीतील रस्ता मंजुर करण्यात आला आहे.मात्र त्या रस्त्यांवर खड्डे पडले. मात्र अद्याप काम सूरू नाही कदाचित ठेकेदार एखाद्या नेत्यांचा जवळचा असल्या शिवाय त्याला एवढी सुट मिळत नसावी मागील वर्षी देखील उत्सव कालावधीत या रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली होती. आगामी नव रात्र उत्सव लक्षात घेऊन ही कामे त्वरित पूर्ण करावी अशी मागणी या पत्रकात नमूद करण्यात आली आहे.

COMMENTS