Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुकोबांच्या पालखीचा परतीचा मुक्काम कुंजीरवाडीत होणार

उरुळी कांचन / वार्ताहर : जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीचा परतीचा मुक्काम कुंजीरवाडी येथे व्हावा, याकरिता कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत प्रशासनान

घरासमोर झोपलेल्या तरूणाचा निर्घृण खून
शिराळा येथे चारचाकी व मोटरसायकल अपघात; एक जखमी तर एक मयत
पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ

उरुळी कांचन / वार्ताहर : जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीचा परतीचा मुक्काम कुंजीरवाडी येथे व्हावा, याकरिता कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्या वर्षांपासून पाठपुरावा केला होता. त्यानंतर पालखी सोहळा प्रमुख व विश्‍वस्तांनी गावाची पाहणी करून परतीचा मुक्काम कुंजीरवाडी येथे होणार असल्याचे निश्‍चित केले. याप्रसंगी पालखी सोहळा अध्यक्ष जालिंदर मोरे महाराज, सरपंच हरेश गोठे, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, सागर निगडे, बाप्पू घुले, गजानन जगताप, काळूराम कुंजीर, नवनाथ आंबेकर उपस्थित होते. सालाबादप्रमाणे देहू येथून तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पुढे तीन दिवसानंतर पुणे-सोलापूर महामार्गवरील लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती येथे पालखीचा रात्रीचा मुक्काम असतो. परतीचा रात्रीचा मुक्काम हा उरुळी कांचन येथे असायचा. मात्र, यात बदल करून पालखी सोहळा प्रमुखांनी परतीचा मुक्काम कुंजीरवाडी येथे होणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, गेल्यावर्षी उरुळी कांचन गावातील विसावा रद्द करून, तो उरुळी कांचन फाट्यावर होईल, असे पालखी सोहळा प्रमुख व विश्‍वस्तांनी जाहीर केले होते. मात्र, याबाबत ग्रामस्थांचे पोलिस प्रशासन व विश्‍वस्तांशी वाद झाले. ग्रामस्थांनी पालखी अडवली. त्यावेळी विश्‍वस्तांनी नगारा बैलगाड्याचे बैल सोडून विरोध दर्शविला होता. परिणामी, वैष्णव भक्तांना निराशेला सामोरे जावे लागले होते.

COMMENTS