राहुरी/प्रतिनिधीः राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्या गटाबरोबर एकनिष्ठ राहिल

राहुरी/प्रतिनिधीः राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्या गटाबरोबर एकनिष्ठ राहिल्याने त्यांच्यावर अधिक विश्वास दाखवत शरद पवार गटाकडून त्यांच्यावर नगर व नाशिकची जबाबदारी देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटी नंतर जिल्ह्यातील सहा पैकी चार आमदार अजित पवार गटाबरोबर गेले. तर आ.रोहित पवार व आ.प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटाबरोबरच राहिले. अजित पवार गटाने नगर जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. यापूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्रीपद भूषविलेले होते. तर त्यावेळी प्राजक्त तनपुरे हे राज्यमंत्री होते. आता त्यांना नगरची ही जबाबदारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटानेही राज्यातील विविध जिल्ह्यांत आपल्या गटातील आमदारांची विविध जिल्ह्यांचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
राहुरीचे आ. प्राजक्त तनपुरे यांच्याकडेही नगर आणि नाशिक या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जिल्ह्यांसाठी प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 2019 ला नगर आणि नाशिक जिल्ह्यांत मिळून जवळपास बारा आमदार राष्ट्रवादीचे आहेत. यात नगर जिल्ह्यातील सहापैकी चार आमदार अजित पवार गटाकडे गेल्याने तर नाशिकमध्येही हीच परिस्थिती असल्याने आमदार तनपुरे यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. यापूर्वी राज्यमंत्री असताना प्राजक्त तनपुरे यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते. तसेच चंद्रपूर व वर्धा या जिल्ह्याचे संपर्क मंत्रीपद आहे. आमदार तनपुरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटातील असल्याने विश्वासू आहेत. अजित पवार गटात गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पुन्हा राजकीय चढाई करून हे गड 2024 ला शरद पवारांच्या अधिपत्याखाली आणण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
COMMENTS