Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’शुक्र तीर्थ’ या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात

कोपरगाव - जिथे कोणतेही शुभ कार्य करण्यास मुहूर्त लागत नाही असे जगातील एकमेव कोपरगाव शहरातून वाहणार्‍या पवित्र आशा गोदावरी नदी किनारी वसलेल्या परम

चैतन्य बहुउद्देशीय संस्थेकडून विद्यार्थ्यांना अधिकार्‍यांचे मार्गदर्शन
केडगाव उपनगरातून हळद फिटण्या अगोदर नववधू पसार
नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात कोविड नियमांचे पालन करुन होणार ‘श्री’ची प्राणप्रतिष्ठा – अ‍ॅड.अभय आगरकर

कोपरगाव – जिथे कोणतेही शुभ कार्य करण्यास मुहूर्त लागत नाही असे जगातील एकमेव कोपरगाव शहरातून वाहणार्‍या पवित्र आशा गोदावरी नदी किनारी वसलेल्या परम सद्गुरू शुक्राचार्य महाराजांची महती सांगणार्‍या परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड लिखित ’शुक्र तीर्थ’ या मराठी पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटामाटात कोपरगाव बेट भागातील शुक्राचार्य मंदिरात घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर रविवारी साधू महंताच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी आत्मा मलिक ध्यान योग मिशन कोकमठाणचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ संत परमानंदगिरीजी महाराज, श्री राघवेश्‍वर देवस्थानचे महंत परमपूज्य राघवेश्‍वरनंदगिरीजी महाराज, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, महानंदा दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिव एस डी कुलकर्णी, मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदिर प्रमुख प्रसाद पर्‍हे, मुंबई येथील शुक्राचार्य महाराजांचे परमभक्त विशाल दोशी, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, बाळासाहेब आव्हाड लिखित शुक्र तीर्थ या मराठी पुस्तकाचे इंग्रजी भाषेत रूपांतर करणार्‍या अदिती आव्हाड, हर्षल आव्हाड, मंदिर समिती सदस्य आदिनाथ ढाकणे यांच्यासह विश्‍वस्त मंडळ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS