Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात सत्ता स्थापनेच्या हालाचालींना वेग; एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

मुंबई : राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ मंगळवारी संपल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर जात आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल यांच्याकडे स

राणा दाम्पत्यांचा वारीमध्ये सहभाग
पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह योजनेचा लाभ 
पुण्यात झिका रूग्णांची संख्या 18 वर

मुंबई : राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ मंगळवारी संपल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर जात आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल यांच्याकडे सुपुर्द केला. त्यानंतर ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री पदावर राहणार आहेत. शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, शुक्रवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुढचा मुख्यमंत्री कोण? असा सवाल उपस्थित होत असतांना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे वरिष्ठ नेते या बाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय देतील तो मान्य राहील असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला. या मोठ्या विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आमचे सरकार स्थापन होईल, असे एकनाथ शिंदे यांनी सकाळी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते. महाआघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवली आणि आजही सोबत आहोत. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ वर्षाबांगल्या बाहेर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी एकत्र येऊ नये, असे आवाहन शिंदे यांनी केले होते. त्यामुळे ते पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा होती. अखेर त्यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांना दिला आहे. 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीला 288 पैकी 230 जागा जिंकून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. यात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. यामुळे भाजप हा मोठा पक्ष ठरला आहे. तर, शिवसेनेला 57 तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. फडणवीस सोमवारी रात्री उशिरा पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीसाठी दिल्लीत गेले होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कन्या अंजली हिच्या लग्नानिमित्त फडणवीस हे दिल्लीला गेले होते. यावेळी फडणवीस यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

एक डिसेंबरला होणार शपथविधी : मिटकरी
दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी हा एक डिसेंबर रोजी होणार असल्याचा दावा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. सरकार स्थापन करण्याची कोणतीच घाई नाही. त्यामुळे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने केले जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यानुसार आता एक डिसेंबरलाच सरकार अस्थित्त्वात येणार असल्याचे बोलले जात आहे.

COMMENTS