Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्ता नसल्याने चक्क गरोदर महिलेला दवाखान्यात झोळी करून नेले.

नाशिकच्या हातपाडा येथील घटना

 नाशिक प्रतिनिधी- नाशिक(Nashik) च्या त्रंबकेश्वर हातपाडा(Thrambakeshwar Hatpada) येथे एक धक्कादायक घटना घडलीयं. चक्क एका गरोदर महिलेला रस्ता न

पिंपळनेर गावी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन
पॅरोल वर सोडण्यात आलेल्या 360 कैद्यांना पकडण्याची विशेष मोहीम सुरु I LOKNews24
आध्यात्मिक स्थान सर्वांना प्रकाश देणारे ठरेल – ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी

 नाशिक प्रतिनिधी- नाशिक(Nashik) च्या त्रंबकेश्वर हातपाडा(Thrambakeshwar Hatpada) येथे एक धक्कादायक घटना घडलीयं. चक्क एका गरोदर महिलेला रस्ता नसल्याने दवाखान्यात झोळी करून नेण्याची वेळ आली आहे. गरोदर महिलेला अचानक कळा सुरू झाल्याने तिला दवाखान्यात घेऊन जात असताना रस्ता नसल्याने कुटुंबीयांनी ब्लँकेटची झोळी करत महिलेला दवाखान्यात पोहचवले. हातपाडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची समस्या आहे. यासंदर्भात अनेकदा ग्रामस्थांनी प्रशासनाला रस्ते तयार करून देण्यासाठी पत्र व्यवहार केले. मात्र, अजूनही रस्ते तयार करून न दिल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

COMMENTS