Homeताज्या बातम्यासंपादकीय

गुन्हेगारांची राजकीय राजधानी !

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आणि महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणारे पुणे शहर. त्याचप्रमाणे शिक्षणा

अजित पवारांची दुहेरी कोंडी
मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला
ब्रिटनमधील सत्तांतराचा अन्वयार्थ

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आणि महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणारे पुणे शहर. त्याचप्रमाणे शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही पुणे शहर ओळखले जाते. मात्र अलीकडच्या काही वर्षांपासून पुणे शहर गुन्हेगारांची राजकीय राजधानी बनू पाहतांना दिसून येत आहे. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवारी रात्री पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. माजी नगरसेवकावर एकापाठोपाठ पाच गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेला अवघे काही तास उलटत नाही तोच एका फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची हत्या करण्यात आली. वासुदेव कुलकर्णी असे खून झालेल्या मॅनेजरचे नाव असून, घरासमोर शतपावली करताना अज्ञाताने धारदार शस्त्राने केला कुलकर्णी यांचा खून करण्यात आले. त्यामुळे पुण्यातील सुरक्षित वातावरण संपल्यागत दिसून येत आहे.

पुण्यात अनेक टोळ्यांनी आपले बस्तान बसवले आहे. पुण्यात जसे गुंडांचे साम्राज्य वाढत आहे, त्याचप्रमाणे पुण्यात ड्रग्जचा विळखा देखील चांगलाच घट्ट होतांना दिसून येत आहे. त्यामुळे पुण्यातील गुन्हेगारी वेळीच ठेचण्याची गरज आहे, अन्यथा पुणे शहराचा नावलौकिक गुन्हेगारांची राजधानी असा होवू नये, इतकाच इशारा. पुणे शहरामध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. या शहरामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी, पुणे विद्यापीठाच्या नावलौकिकामुळे राज्यभरातील विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र या शहराचे वातावरण आजमितीस दूषित होतांना दिसून येत आहे. कारण पुण्यात सातत्याने गुंडांच्या टोळ्या दिवसाढवळ्या मुडदे पाडतांना दिसून येत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे. पुण्यात काही वर्षांपूर्वी कोयता गँगने धुमाकूळ घातला होता. अजूनही कोयता गँगच्या कारनाम्याचे किस्से ऐकू येतात. मात्र त्याचबरोबर पुण्यात गुंडांचे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे या गुंडांना पोसणारे कोण, याचाही शोध घेण्याची गरज आहे. पुणे पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार अमितेशकुमार यांनी फेबु्रवारी 2024 मध्ये स्वीकारल्यानंतर पुण्यातील गुन्हेगारी आटोक्यात येईल असे वाटले होते. कारण त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.

पुण्यातील नामचीन गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेत क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात आले होते. यामुळे कुख्यात गुंड, रेकॉर्डवरील आणि झोपडपट्टी परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस ठाणे आणि पोलिस चौक्यांतील अधिकारी, कर्मचार्‍यांना सूचना दिल्या होत्या. यासोबतच त्यांनी गुंडांची परेड घेणे, त्यांना दम भरणे असा कृती कार्यक्रम राबवला होता. मात्र तब्बल सात महिने उलटल्यानंतर अमितेशकुमार यांच्या कामकाजांचे मूल्यमापन केल्यास ते अपयशी ठरतांना दिसून येतात. वास्तविक पाहता अमितेशकुमार त्यांचा कृतीकार्यक्रम राबवित यशस्वी देखील झाले असते, मात्र पुणे शहरात गुंडांना मिळणारा राजकीय आश्रय, आणि त्यामुळे पोलिसांना कारवाई करण्यात येणारे अडथळे याकडे देखील दुर्लक्ष करता येणार नाही. पुण्यातील गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढतांना दिसून येत आहे. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे या गुंडांना मिळणारा राजकीय आश्रय. हा राजकीय आश्रय एक पक्ष देत नसून अनेक पक्षांचे नेते या गुंडांना पोसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांचे देखील हात बांधले जातात. एकेकाळी मुंंंबईमध्ये जसा कुख्यात गुंडांनी नंगानाच चालवला होता, जशा खंडणीचे गुन्हे, खंडणी नाही दिल्यास दिवसाढवळ्या हत्या करण्यासारखे गुन्हे घडत होते. मात्र मुंबईतील गुंडगिरी मोडीत काढण्यात यश मिळाले असले तरी, पुण्याची वाटचाल मुंबईच्या दिशेने सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुणे शहराचा हा नावलौकिक धुळीस मिळतांना दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी आणि राजकीय नेत्यांनी पुण्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी इच्छाशक्ती दाखवण्याची खरी गरज आहे. 

COMMENTS