Homeताज्या बातम्यादेश

ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यावर गोळीबार पोलिस अधिकार्‍यानेच झाडल्या 4-5 गोळया

प्रकृती चिंताजनक ; आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

भुवनेश्‍वर/वृत्तसंस्था ः ओडिशा राज्याचे कॅबिनेट आरोग्यमंत्री नाबा दास यांच्यावर रविवारी जीवघेणा हल्ला झाला असून, या हल्ल्यात त्यांची प्रकृती चिंत

गोवरचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी चोपडा नगरपालिका ॲक्शन मोड वरती
शेवटी आईच काळीज! Filmy Masala
बोगस प्रमाणपत्रांचा गोरधधंदा

भुवनेश्‍वर/वृत्तसंस्था ः ओडिशा राज्याचे कॅबिनेट आरोग्यमंत्री नाबा दास यांच्यावर रविवारी जीवघेणा हल्ला झाला असून, या हल्ल्यात त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर येथे नाबा यांच्यावर हा हल्ला झाला आहे. एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले असता ते कारमधून उतरताच त्यांच्यावर गोळ्या घालण्यात आल्या. एका पोलिस अधिकार्‍यानेच त्यांच्यावर गोळ्या घातल्या. त्यामुळे नाबा खाली कोसळले. जखमी अवस्थेतच नाबा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, दिवसाढवळ्या प्रचंड सुरक्षा बंदोबस्त असतानाही हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस अधिकार्‍याने केलेल्या या गोळीबारमध्ये आरोग्यमंत्री दास यांच्या छातीत 4 ते 5 गोळ्या शिरल्या आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी हल्ला करणार्‍या एएसआय गोपालदास याला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 12.15 च्या सुमारास हा हल्ला झाला. नबा दास ब्रजराजनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. कारमधून उतरताच गोपालदास यांनी त्यांना गोळ्या घातल्या. सध्या नबा दास यांना पुढील उपचारांसाठी हवाई रुग्णवाहिकेद्वारे भुवनेश्‍वरला हलवण्यात आले आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आरोग्यमंत्री नबा दास या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी गर्दी जमली होती. तेव्हा अचानक कुणीतरी त्यांच्यावर गोळीबार केला. एक पोलिस कर्मचार्‍याने त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार केला. त्यानंतर तो पळून जात असताना आम्ही पाहिले. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आपल्या आरोग्यमंत्र्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, हल्ल्याचे वृत्त ऐकून स्तब्ध झालो. मी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याची कामना करतो. गुन्हे अन्वेषण विभागाला मी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. अधिकार्‍यांनाही घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिलेत. नबा किशोर दास यांनी 2004 मध्ये ओडिशाच्या झारसुगुडा मतदारसंघातून पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 2014 मध्येही ते काँग्रेसकडून विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीत ते या जागेवरून सलग तिसर्‍यांदा आमदार म्हणून निवडून आले. नबा दास या क्षेत्रातील एक प्रभावशाली नेते मानले जातात.

सर्वात श्रीमंत मंत्र्यांमध्ये समावेश – नबा किशोर ओडिशा सरकारच्या सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे 15 कोटींहून अधिकच्या किंमतीची जवळपास 70 वाहने आहेत. त्यात एका मर्सिडीज बेंझचाही समावेश आहे. या कारची किंमत जवळपास 1.14 कोटी रुपये आहेे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अहमदनगर येथील शनी शिंगणापूर येथे शनीदेवाचे दर्शन घेत तब्बल 1 कोटी रुपयांचा सोन्याचा कलश अर्पण केला होता.

COMMENTS