देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथील तुषार भागवत खिलारी याचे आई वडीलांनी लग्न करु दिले नाही म्हणून लोखंडी धातूचे सुरा घेवून हल्ला क
देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथील तुषार भागवत खिलारी याचे आई वडीलांनी लग्न करु दिले नाही म्हणून लोखंडी धातूचे सुरा घेवून हल्ला करणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती.खाञी करण्यासाठी पोलिस पथक पाठवले असता लोखंडी हत्याराने आई वडीलांवर हल्ला करण्यापूर्वी पोलिसांनी घातक हत्यारासह शिताफीने तुषार भागवत खिलारी (वय 25 वर्ष) यास ताब्यात घेवून शस्त्र अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथे सोमवार दि.29 रोजी मध्यराञीच्या सुमारास तुषार भागवत खिलारी या तरुणाने हातात लोखंडी घातक शस्ञ हातात घेवून आई वडीलांना मारण्यासाठी जाणार असल्याची गोपनिय माहिती खबर्या मार्फत मिळाली होती.मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांचे एक पथक पाठविण्यात आले.पोलिस पथक कुरणवाडी येथे पोहचले त्यावेळी तुषार भागवत खिलारी हा हातात घातक शस्ञ घेवून घराकडे चालला होता. पोलिसांनी शिताफीने घातक शस्ञासह ताब्यात घेवून राहुरी पोलिस ठाण्यात आणण्यात आले.शस्त्र अधिनियम कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, वैभव कलुबर्मे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग बसवराज शिवपुजे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे, गणेश सानप, सुरज गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल भगवान थोरात,आदिनाथ पाखरे यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.
अवैध शस्त्र बाळगणार्यांची माहिती द्यावी ः संजय ठेंगे – राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने जाहिर आव्हान करण्यात येते की अवैध शस्त्रजवळ बाळगून दहशत निर्माण करणे किंवा गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी वापरीत असेल तर अशा व्यक्तीची माहिती राहुरी पोलिस ठाण्यात द्यावी.माहिती देणार्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले.
COMMENTS