Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाऊसाने खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप

रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण.

त्र्यंबकेश्वर - आज येथे ब्रह्मगिरी डोंगरावर जोरदार पाऊस झाला त्यामुळे त्रंबकेश्वर नगरीत रस्त्यांवर पाणीच पाणी आले. कुंभार तलावं वाहन तळ पार्किंग

गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पुणे पॅटर्न उपयुक्त
पोलिस भरतीत बनावट प्रमाणपत्र सादर करणे पडले महागात
‘एक देश एक निवडणूक’वरून संसदेत गोंधळ ; लोकसभेत विधेयक मांडले

त्र्यंबकेश्वर – आज येथे ब्रह्मगिरी डोंगरावर जोरदार पाऊस झाला त्यामुळे त्रंबकेश्वर नगरीत रस्त्यांवर पाणीच पाणी आले. कुंभार तलावं वाहन तळ पार्किंग जव्हार रोड चौफुली कडे जाणारा रस्ता त्र्यंबकेश्वर गावातील ठिकाणी खड्डे असल्याने अपघातांना निमंत्रण मिळू शकते या खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले.शनिवार  दिनांक सहा रोजी घेतलेले फोटो तर पंचायती बडा उदासीन आखाडा रिंग रोड कडे जाणारा रस्ता पंचलिंग डोंगर पट्ट्यातून धो धो पाणी वाढल्याने हा रस्ता आडला छोटे खाणीपूरच साचला होता. हा वाहने काढताना वाहनधारकांना वाहने बंद पडल्याचा अनुभव देखील आला वाहने आडकली. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने लक्ष घालावे अशी जोरदार मागणी आहे. सुदैवाने दुसऱ्या बाजूला कठडा असून त्यावरती पाणी गेले असते तर नजीच्या संकुलात पाणी गेले असते पण तसे झाले नाही. पाऊस उघडल्याने तशी वेळ आली नाही. ठिकठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही तसेच खड्डे बुजवावे अशी जोरदार मागणी आहे.दरम्यान वरील ठिकाणचे पाणी दुपारी चार नंतर पूर्ण ओसरले.

COMMENTS