Homeताज्या बातम्यादेश

व्यक्तीला बोनेटवरून फरफटत नेले

नवी दिल्ली प्रतिनिधी - राजधानी दिल्लीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास आश्रम चौकाकडून निजामुद्दीन दर्ग्याच

राज्यात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करणार
दुकानातल्या आईस्क्रीमच्या फ्रीजरचा शॉक लागून 4 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू.
वडी येथील युवकाचा खून; चौघांना अटक; एकजण फरार

नवी दिल्ली प्रतिनिधी – राजधानी दिल्लीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास आश्रम चौकाकडून निजामुद्दीन दर्ग्याच्या दिशेने येणारी एक कार बोनेटला लटकलेल्या व्यक्तीसह सुमारे 2-3 किलोमीटर रस्त्यावर धावत होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपीच्या कारचा पाठलाग करून बोनेटवर लटकलेल्या व्यक्तीचा जीव वाचवला. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार बिहारचे लोकसभा खासदार चंदन सिंह यांची असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी खासदार गाडीत उपस्थित नव्हते, चालक गाडी चालवत होता. पोलिसांनी बेजबाबदारपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

चेतन असं पीडित तरुणाचं नाव असून तो कॅब चालक आहे. चेतनने सांगितलं की, ‘मी ड्रायव्हर म्हणून काम करतो, एका प्रवाशाला सोडून परतत होतो. आश्रमजवळ पोहोचल्यावर एका कारने माझ्या कारला तीन वेळा जोरदार धडक दिली. मग मी माझ्या गाडीतून बाहेर आलो आणि त्याच्या गाडीसमोर उभा राहिलो. त्यानंतर त्याने गाडी सुरू केली आणि मी गाडीच्या बोनेटला लटकलो’. पीडित तरुणाने सांगितलं की, ‘मी आश्रम चौक ते निजामुद्दीनपर्यंत गाडीच्या बोनेटला लटकत राहिलो. मी त्याला थांबायला सांगत राहिलो, पण तो थांबला नाही. ती व्यक्ती दारूच्या नशेत होती. वाटेत मला एक पीसीआर उभा असलेला दिसला आणि त्यात असलेल्या पोलिसांनी आमचा पाठलाग करून काही वेळात आरोपीला अडवलं’. दुसरीकडे आरोपी ड्रायव्हर रामचंद कुमार म्हणाला, ‘त्यानी माझ्यावर जबरदस्ती केली. माझ्या गाडीचा त्याच्या गाडीला धक्काही लागला नाही, तुम्ही दोन्ही वाहने बघा, गाडीचा थोडासा भागही त्याच्या गाडीला लागला असेल, तर मी स्वतःला दोषी समजेन. त्यानी माझी गाडी जबरदस्तीने अडवली. मी गाडी चालवत होतो आणि त्याने जबरदस्तीने माझ्या गाडीच्या बोनेटवर उडी मारली. मी थांबलो आणि म्हणालो भाऊ, काय करतोयस, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं’.

COMMENTS