Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मळगंगादेवीच्या पालखी मिरवणूकीचे जल्लोषात स्वागत

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः मळगंगा मातेचा जयघोष करत नेवासा येथे बुधवारी 19 एप्रिल रोजी मळगंगा देवीचा पालखी महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी काढण्यात

शेतमजुराची मुलगी झाली वनरक्षक
वारीत सर्व रोग निदान शिबिरात 170 रुग्णांची तपासणी
योगिता खेडकर व हर्षदा गरुड यांची वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः मळगंगा मातेचा जयघोष करत नेवासा येथे बुधवारी 19 एप्रिल रोजी मळगंगा देवीचा पालखी महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या श्री मळगंगादेवी पालखी व झेंडा मिरवणुकीचे नेवासेकरांच्या वतीने फटाक्याच्या आतषबाजीने चौकाचौकात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
      नेवासा शहरातील एस.टी. स्टँडजवळ असलेल्या श्री मळगंगा देवीच्या मंदिरापासून बुधवारी सायंकाळी 6.30 वाजता श्री मळगंगा देवीच्या पालखी व काठी मिरवणूकीस प्रारंभ झाला. यावेळी मळगंगादेवी मंदिराचे मार्गदर्शक व सेवेकरी देविभक्त रेणूकदास उर्फ भाऊ घोलप सुमनताई घोलप परशुराम घोलप व लताताई घोलप यांच्या हस्ते पालखीचे खंजिरी तुणतुण्याच्या निनादात विधीवत पूजन करण्यात आले.यावेळी निघालेल्या पालखी मिरवणुकीत मंदिर विश्‍वस्त उद्योजक रामभाऊ घोलप, ज्योतीताई  घोलप,सचिन घोलप, जयश्रीताई घोलप, संदीप घोलप, भारतीताई घोलप, सागर घोलप, वैशाली घोलप यांच्यासह महिला व पुरुष भाविक मोठया संख्येने सहभागी झाले होते. पालखी व झेंडा काठी मिरवणूक एस टी स्टँड चौक, खोलेश्‍वर गणपती चौक, नगरपंचायत चौक, डॉ. हेडगेवार चौक, मारुती चौक, श्री मोहिनीराज मंदिर चौक, संभाजी चौक मार्गे श्रीरामपूर रोडवरून पुन्हा श्री मळगंगादेवीच्या मंदिरात आली. यावेळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांना आंबिल व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.त्यांनतर रात्री बेलपिंपळगाव येथील जागरण गोंधळ कलाकार रमेश गुलदगड व सहकार्‍यांच्या वतीने जागरण गोंधळ कार्यक्रम सादर करण्यात येऊन या उत्सवाची सांगता करण्यात आली. पारनेर तालुक्यातील निघोज येथील श्री मळगंगा देवीचा पालखी उत्सव व यात्रोत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध असून नेवासा येथून मळगंगादेवीची पायी पालखी दिंडी परंपरेने काढली जाते निघोज येथे नेवासा येथील पालखीला मान दिला जातो पालखी पुन्हा परतीच्या प्रवास करत नेवासा येथे येते म्हणून श्री मळगंगा देवीची पालखी मिरवणूक काढून येथे देखील यात्रा उत्सव साजरा करण्याची परंपरा घोलप घराण्याच्या वतीने सुरू असून पालखी मिरवणुकीनंतर महाआरती करून येथे सोहळा साजरा करण्यात येतो. यावर्षी झालेल्या पालखी मिरवणूक व यात्रा सोहळयाप्रसंगी हजारो भाविकांनी श्री मळगंगादेवीचे दर्शन घेतले. यावेळी  मंदिर प्रांगण गर्दीने फुलून गेले होते. यावेळी नेवासा शहरातील भाविक तसेच निघोज येथील कवाद बधु व भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

COMMENTS