Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घेणार्‍यांवर कठोर कारवाई करा; किनवटमध्ये संघटना आक्रमक

किनवट । प्रतिनीधी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय योजनांचा गैरफायदा घेणार्‍या अपात्र व्यक्तींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर

पुण्यात लाचखोर आरटीओ अधिकार्‍याला पदोन्नती
सा.बां.तील शाखा अभियंता कमलापुरेचा भ्रष्टाचाराचा उच्छाद  
एसटीतील करोडो-अरबोंचा भ्रष्टाचार थांबवा; महिला व ज्येष्ठांच्या सवलतींना हात लावू नका – नितीन जायभाये यांचा इशारा

किनवट । प्रतिनीधी
बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय योजनांचा गैरफायदा घेणार्‍या अपात्र व्यक्तींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी किनवट येथील दिव्यांग संघटनांनी केली आहे. यासंदर्भात नांदेड जिल्हा सेक्युलर दिव्यांग मुव्हमेंट व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने नगर परिषद आणि पंचायत समिती प्रशासनाला सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना केवळ कागदावरच असून, प्रभावी अंमलबजावणीअभावी पात्र दिव्यांग बांधव लाभांपासून वंचित राहत आहेत. दुसरीकडे, अपात्र व्यक्ती बनावट प्रमाणपत्रांचा आधार घेऊन शासनाच्या निधीचा अपव्यय करत आहेत. अशा प्रवृत्तींमुळे गरजू दिव्यांगांवर मोठा अन्याय होत असून, प्रशासनाने तात्काळ अशा प्रमाणपत्रांची पडताळणी करून ती रद्द करावी आणि लाभार्थ्यांकडून लाभ वसूल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दिव्यांग बांधवांच्या जीवनमानाशी निगडित अनेक महत्त्वाचे मुद्दे या निवेदनात मांडण्यात आले आहेत. पायाभूत सुविधा: सर्व शासकीय कार्यालये, शाळा, आरोग्य केंद्रे व सार्वजनिक इमारतींमध्ये रॅम्प, रेलिंग आणि स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था करणे. स्वतंत्र मदत कक्ष: दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्न, जात प्रमाणपत्र, आधार व आयुष्मान कार्डासाठी प्रशासनाने स्वतंत्र खिडकी किंवा मदत कक्ष सुरू करावा. आर्थिक लाभ: पेन्शन व इतर योजनांचे लाभ वेळेवर मिळावेत आणि लाभार्थी यादी अद्ययावत करावी. शैक्षणिक व रोजगार: दिव्यांगांना शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती, स्वरोजगार प्रशिक्षण आणि आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी. तक्रार निवारण: दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करावी. बनावट प्रमाणपत्रधारकांमुळे खर्‍या दिव्यांगांचे हक्क हिरावले जात आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून पारदर्शक अंमलबजावणी करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल.  अ‍ॅड. मिलिंद सर्पे व भगवान मारपवार या निवेदनावर अ‍ॅड. मिलिंद सर्पे (अध्यक्ष, नांदेड जिल्हा सेक्युलर दिव्यांग मुव्हमेंट) आणि भगवान मारपवार (अध्यक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना) यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

COMMENTS