Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाफेड व एन सी सी एफ माध्यमातून चालू असलेली शेतकऱ्यांची फसवणूक त्वरित थांबवून दोषींवर कडक कारवाई करावी- करण गायकर

नाशिक - नाफेड चे अध्यक्ष जेठाभाई आहिर यांनी नुकतीच नाशिक च्या नाफेड कांदा खरेदी केंद्रावर अचानक भेट दिली त्यामध्ये त्यांच्या निदर्शनास आले की

स्वराज्य संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालय लोकार्पण सोहळ्याला व पहिल्या अधिवेशनाला नाशिक जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार- करण गायकर
स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे नाशिक दौऱ्यावर – करण गायकर  
मुंबई येथे होणाऱ्या मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या आंदोलनात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा -करण गायकर

नाशिक – नाफेड चे अध्यक्ष जेठाभाई आहिर यांनी नुकतीच नाशिक च्या नाफेड कांदा खरेदी केंद्रावर अचानक भेट दिली त्यामध्ये त्यांच्या निदर्शनास आले की नाफेड च्या माध्यमातून शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली आहे.  नाफेड एन सी सी एफ चा उद्देश हा शेतकऱ्यांचा कांदा हा चांगल्या दराने खरेदी करून त्यांना नफा मिळवून देणे असा असताना नाशिक मधील अधिकारी कर्मचारी मात्र तस न करता सरळ बाजार समितीतून कांदा खरेदी करून त्याचे साठवण करत असल्याचे पितळ उघडे झाले आहे.

आजमितीला कांद्याला योग्य भाव नाही म्हणून शेतकरी संकटात असताना अशा पद्धतीने ना चालू असलेला सावळा गोंधळ हा अत्यंत भयावह आहे. एकीकडे शेतकरी राबराब राबून कांद्याचे पीक घेतो दुसरीकडे व्यापारी तो कांदा कवडी मोल भावाला खरेदी करतो आणि तिकडे नाफेड व एन सी सी एफ शेतकऱ्या कडून कांदा खरेदी न करता व्यापारी व बाजार समितीतून कांदा खरेदी करते म्हणजे यातून फायदा हा फक्त व्यापारी वर्गाला करून दिला जातो आहे आणि शेतकरी वर्ग मात्र नुकसान सहन करत आहे. अशा पद्धतीने नाफेड व एन सी सी एफ चे अधिकारी व संचालक मंडळ काम करत असतील राज्य सरकार व केंद्र सरकारने त्वरित अशा अधिकारी व संचालक मंडळावर तात्काळ कारवाई करून चौकशीचे आदेश द्यावेत.व सध्यस्थितीत नाफेड चे असलेले संचालक मंडळ बरखास्त करावे.

व्यापारी धार्जिणे अधिकारी कर्मचारी संचालक यांच्यावर जरब बसवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा या विरोधात मोठे आंदोलन उभे करून छावा स्टाईल उत्तर देण्यात येईल याची देखील नोंद घ्यावी.शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याला हक्काचा भाव देणे ही नाफेडची जबाबदारी असताना तसेच नाफेड कडून खरेदी होणाऱ्या कांद्याचे दर स्पर्धात्मक नाहीत उलट शेतकऱ्याला या नाफेडच्या माध्यमातून कुठलाही फायदा होताना दिसत नसल्याचे अध्यक्षांकडून सांगण्यात आले आहे.त्यांनी केलेल्या पाहणीमध्ये सटाणा,वासोळ,देवळा,चांदवड,या खरेदी केंद्रांवर अनेक गैरप्रकार समोर आलेले आहेत त्यामध्ये काही शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ खरेदी केंद्र व काही नाफेडचे अधिकारी यात सामील असल्याचेही कळालेले आहेत खरेदीत शेतकऱ्यांची निवड प्रत्यक्ष खरेदी करताना मालाची प्रतवारी तपासून खरेदी होणे अपेक्षित आहे.मात्र खरेदी केंद्रांवर याबाबत कुठलेही योग्य काम होताना दिसत नाही कुठलेही धोरण निकष पाळले जात नसल्याचेही यावेळी त्यांनी निदर्शनास आणून दिले असल्याने या सर्व शेतकरी उत्पादक महासंघाच्या कंपन्या खरेदी केंद्र तात्काळ सील करून केंद्र सरकारने व राज्य सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा या सर्व केंद्रांच्या माध्यमातून जो अधिकचा कांदा खरेदी केला गेला आहे त्या कांद्याची विक्री करून ती थेट शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात द्यावी अन्यथा छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने राज्यभर या विरोधात आंदोलन उभे करून आपल्या प्रशासनास जाब विचारला जाईल व याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल.याची आपण नोंद घ्यावी.

सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचा एवढा मोठा काळाबाजार होत असताना नवनियुक्त संचालकांनीही त्याला दुजोरा दिला मग दुजोरा देत असताना नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्याचे कारण असे की त्यांच्या जिल्ह्यामध्येच सगळ्यात मोठा घोटाळा त्यांच्याच अध्यक्षांनी समोर आणून दिल्यामुळे नवनियुक्त संचालक मंडळाने राजीनामा देऊन जबाबदारी स्वीकारावी. त्याचबरोबर कांद्याचे राजकारण करून जे खासदार निवडून आले ते खासदार आज एक शब्दही बोलत नाही याचा अर्थ तुम्हाला शेतकरी आणि कांदा हे फक्त राजकारण करण्यासाठी हवे आहे जर खासदारांमध्ये थोडी जरी नैतिकता उरली असेल तर त्यांनी याबाबत आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. करण गायकर छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य.

COMMENTS