कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव नगरपालिकेची जुनी सायन्स शाळा अद्यावत करण्याचा पाठपुरवठा करणार असल्याची ग्वाही माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी कोपरग
कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव नगरपालिकेची जुनी सायन्स शाळा अद्यावत करण्याचा पाठपुरवठा करणार असल्याची ग्वाही माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी कोपरगाव शहरातील संविधान चौक टिळक नगर फाउंडेशनच्या वतीने भगवान गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी बोलताना दिली. यावेळी भदंत कश्यप लुंम्बिनी विहार यांच्या हस्ते गौतम बुद्धांची व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले.
यावेळी पाटील पुढे बोलताना म्हणाले की, भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे देश चालत आहे. कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात टिळक नगर, संजयनगर, सुभाषनगर, गांधीनगर,105, खडकी लक्ष्मीनगर, नदीकाठचा भाग, बैल बाजार रोड अशा बर्याच ठिकाणी गोरगरीब व हातावरची जनता लोक माता भगिनी राहात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत गोरगरीब तळागाळातील लोक मुले शिकत नाही तोपर्यंत त्यांच्या आई-वडिलांचे मनातील आपली मुले मोठे झाले पाहिजे, त्यांना चांगल्या घरात राहिला आले पाहिजे, त्यांना चांगली जीवन उपभोक्ता आले पाहिजे. जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे यासाठी शिकल्याशिवाय पर्याय नाही म्हणून नेहमी वंचितांसाठी गोरगरिबांसाठी झटत असणारी या संविधान चौक फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन शिंदे व त्यांचे सहकारी तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले शुगर केन ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष परांग संधान, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगरसेविका वर्षा शिंगाडे, बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन या सर्वांनी एकत्र येऊन नगरपालिकेची शाळा नगरपालिके मार्फत प्रयत्न करून ही जर सर्व सोयीन युक्त अद्यावत अशी जर केली तर निश्चित पणे कोपरगाव शहरातील गोरगरीब माता-भगिनी यांची मुले येथे चांगल्या प्रकारे शिक्षण घेतील व मोठे होतील हेच तथागत बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आम्ही यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी या प्रसंगी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार बिपिन गायकवाड यांनी केले. यावेळी व्यासपीठावर बौद्धाचार्य नानासाहेब जगताप, अॅड. अजित झोडगे, साहेबराव कोपरे, मार्केट कमिटीचे सचिव नानासाहेब रणशुर, जितेंद्र साळवे, मेजर मारुती कोपरे, माजी नगरसेवक संजय कांबळे, शिवाजी चाबुकस्वार, अशोक कोपरे, सागर कोपरे, सचिन शिंदे, विशाल शिंदे, पप्पू बागुल, बाला पवार, जीवन वाघमारे, गोरख इंगळे, रेखा चाबूकस्वार, लक्ष्मी वाघमारे, भारती शिंदे यांसह अनेक मान्यवर व महिला माता भगिनी, बाळ गोपाळ मुली मुली मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
COMMENTS