Homeताज्या बातम्या

विदर्भात शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढला

नागपूर : विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात शेतकर्‍यांनी सर्वाधिक आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. सततची

लसीमधील अंतर वाढविण्याची शिफारसच नव्हतीः शास्त्रज्ञ
जामखेडमध्ये जुन्या भांडणातून कोयत्याने वार
भररस्त्यात दोन मोकाट बैल आमने-सामने

नागपूर : विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात शेतकर्‍यांनी सर्वाधिक आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. सततची नापिकी, कर्ज, पावसाचा खंड, अतिवृष्टी यामुळे पिकांचे उत्पादन कमी होण्याची भीती तसेच शासनाचे उदासीन धोरण या कारणांचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. यंदा जिल्ह्यात 1 जानेवारी ते 30 सप्टेंबरपर्यंत 193 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये शेतकरी आत्महत्यांच्या निकषानुसार 77 पात्र ठरल्या आहेत. तर, 46 आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. याशिवाय 70 प्रकरणे चौकशीकरिता प्रलंबित आहेत. शेतकरी आत्महत्याचे सत्र थांबणार कधी असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

COMMENTS