Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढणार

प्रभागसंख्या 2 तर नगरसेवक 3 ने वाढणार

श्रीगोंदा प्रतिनिधी ः श्रीगोंदा शहराची लोकसंख्या 2011 साली झालेल्या जणगणने नुसार 31 हजार होती.ती लोकसंख्या विचारात घेऊन नगरसेवकांची संख्या 19 ऐवज

भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयानंतर श्रीरामपुरमध्ये जल्लोष
धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी
राजकीय पक्षांच्या ऑफर धुडकावत सामाजिक कामांनाच महत्व दिले : पोपटराव पवार

श्रीगोंदा प्रतिनिधी ः श्रीगोंदा शहराची लोकसंख्या 2011 साली झालेल्या जणगणने नुसार 31 हजार होती.ती लोकसंख्या विचारात घेऊन नगरसेवकांची संख्या 19 ऐवजी 22 तर प्रभाग संख्या 9 ऐवजी 11 करण्यात आली असल्याचे राजपत्र काढण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी दिला. या राजपत्रानुसार 14 जागा  सर्वसाधारण, अनुसूचित जाती 3 तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 5 जागा राखीव असणार आहेत.आरक्षित जागांपैकी अनुसूचित जाती तीन जागांपैकी 2 जागा महिला राखीव, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 5 जागा पैकी 3 जागा महिला राखीव,तर सर्व साधारण 14 जागा पैकी 6जागा महिला.अशा एकुण 22 पैकी 11जागा महिला साठी आरक्षित असणार आहेत. सध्या नगरपरिदेमधे 19 नगरसेवक व लोकनियुक्त नगराध्यक्षा असे 20 सदस्य कामकाज पाहत आहेत. नगरसेवक संख्या वाढल्याने निवडणुकीची तयारी करत असलेल्या अनेकांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

COMMENTS