मुंबई प्रतिनिधी - दिग्पाल लांजेकर या मराठी दिग्दर्शकाने शिवराज अष्टकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर मांडण्याचं शिवधनुष्य हाती
मुंबई प्रतिनिधी – दिग्पाल लांजेकर या मराठी दिग्दर्शकाने शिवराज अष्टकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर मांडण्याचं शिवधनुष्य हाती घेतलं आहे आणि हे काम तो अत्यंच जबाबदारीने आणि यशस्वीपणे पार पाडत आहे. त्याने शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आणलेले पाचही चित्रपट सुपरहिट ठरले. आता त्याचा ‘शिवरायांचा छावा’ हा सहावा संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, आणि प्रेक्षकांना याबद्दल कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, या चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार असा एक मोठा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. चित्रपटाचं पहिलं पोस्टर आऊट करण्यात आलं, त्यात संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा कलाकार पाठमोरा उभा होता, त्यामुळे काहीच अंदाज येऊ शकला नाही. आज सिनेमाचं दुसरं पोस्टर आऊट करण्यात आलं, पण गंमतीची बाब अशी की यात कलाकाराचा चेहरा समोर असूनही तो ओळखता येत नाही.
चित्रपटाचं दुसरं पोस्टर मोठ्या शिताफीने डिझाईन करण्यात आलं आहे. संभाजी महाराज साकारणार्या कलाकाराविषयी प्रेक्षकांची उत्सुकता ताणून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. पोस्टरमध्ये छत्रपती संभाजी महाराज साकारणाऱ्या अभिनेत्याची झलक बघायला मिळतेय. मागे सिंह दिसत असून त्यासमोर रुद्रावतारात संभाजी महाराज बघायला मिळत आहेत.
COMMENTS