Homeताज्या बातम्यासंपादकीय

फसवणुकीचा नवा अवतार !

खरंतर संपूर्ण जग प्रगत आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अद्यावत होतांना दिसून येत आहे. एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमता या टेक्नॉलाजीने आजमितीस नवे आव्हान

पवारांचे सोयीचे राजकारण …
पुरोगामी चळवळीचा आधारवड
काँगे्रसचे प्रियंका अस्त्र चालणार का?

खरंतर संपूर्ण जग प्रगत आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अद्यावत होतांना दिसून येत आहे. एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमता या टेक्नॉलाजीने आजमितीस नवे आव्हान निर्माण केले आहे. या तंत्रज्ञानामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे, मात्र या तंत्रज्ञानाचे दुहेरी आव्हान आपल्यासमोर असतांनाच सर्वसामान्यांना फसवणुकीचे नवे पॅटर्न समोर येतांना दिसून येत आहे. खरंतर मध्यमवर्गीय कुटुंब पै-पै पैशांची बचत करून पैसे जमा करतात. याचा अर्थ एकत असतो की, आपल्याकडे जन्मजात कोणतीही संपत्ती वारशाने आलेली नाही, शिवाय भविष्यातील आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी ही जमापुंजी उपयोगी पडेल म्हणून मध्यमवर्गीय पै-पै हातचे राखून ही पुंजी करतात आणि अचानक कुणी उगवतो आणि गुंतवणूकीचे आमिष दाखवतो आणि त्यांची आयुष्याची जमापुंजी घेवून फरार होतो. खरंतर असाच फसवणुकीचा नवा पॅटर्न टोरेस ज्वेलरी हाऊस घोटाळातून उधड होतो.
वास्तविक पाहता या कथित टोरेस ज्वेलरी हाऊसने मुंबई परिसरात सहा अलिशान शोरूम उघडले होते. या शोरूमच्या माध्यमातून तब्बल सव्वा लाख गुंतवणूकदारांना हजार कोटींचा गंडा घालून यातील महाभाग फरार झाले आहेत. या फरार झालेल्या परदेशी प्रवर्तकांविरूद्ध लुक आऊट नोटीस जारी करत त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असले तरी, त्यांनी तोपर्यंत पोबारा केला होता. खरंतर यामागची विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये सव्वा लाख गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली होती. त्यांना आमिष दाखवण्यासाठी छान परतावा काही दिवस दिला जात होता, याचाच अर्थ या गुंतवणूकदारांचा आधी विश्‍वास जिंकला, त्यानंतर त्यांना कोट्यावधीचा गंडा घालण्यात आला. सायबर गुन्हे कमी झाले म्हणून फसवणूकीचा हा नवा अवतार जन्माला आला. खरंतर या प्रकरणात पोलिसांनी कसोशीने चौकशी करण्याची खरी गरज आहे. या ज्वेलरी हाऊसला सहा शोरूम उघडण्यासाठी कार्यालये कुणी दिली, ती जागा त्यांनी भाडेकरार तत्वावर घेतली का? त्यासाठी त्यांनी कोणती कागदपत्रे जमा केली, मालकांनी त्यांची खात्री केली का? त्यासंदर्भात जवळच्या पोलिस स्टेशनला कल्पना दिली का? या सर्व बाबींचा उहापोह होण्याची गरज आहे. तसेच या संपूर्ण घोटाळ्यात स्थानिक व्यक्ती सहभागी असल्याशिवाय एवढा मोठा घोटाळा होवू शकत नाही, त्यामुळे या संपूर्ण घोटाळ्याची पाळेमुळे खणण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोरपणे तपासणी करण्याची खरी गरज आहे.
खरंतर या ज्वेलरी शॉपने गुंतवणूकदारांना मोठी भूरळ पाडली होती. ‘टोरेस’ हे ज्वेलरी ब्रँडचे नाव होते. प्लॅटिनम हर्न प्रा. लि. या कंपनीमार्फत तो चालविला जात असल्याचे आता उघड झाले आहे. शिवाय कंपनीचे अद्ययावत संकेतस्थळ उपलब्ध होते. याशिवाय दादर, ग्रँट रोड, बोरिवली, मीरा रोड, वाशी, कल्याण आदी ठिकाणी आलिशान शोरुम्स उघडण्यात आली होती. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स आणि आणि त्याही कमी किमतीत देवून गुंतवणूकदारांचा विश्‍वास संपादन करण्यात ही कंपनी यशस्वी ठरली आणि त्यानंतर या कंपनीने हात साफ केला. खरंतर नियोजनबद्धपणे स्वा लाख गुंतवणूकदारांच्या बचतीवर या कंपनीने डल्ला मारला आहे. या कंपनीने विविध योजना आणल्या होत्या, त्यामध्ये सोन्यात गुंतवणूक करा आणि व्याज घ्या, चांदीत गुंतवणूक करून आणखी जास्त व्याज घ्या अशा व्योजना आणल्या होता. त्यामुळे चांगला परताव्याचे आमिष दाखवून त्यांनी हजारो कोटी रूपये गोळा केले. आणि या कंपनीचे कर्तेधर्ते फरार झाले. वास्तविक गुंतवणूकदारांनी जोखीम पत्करण्यापूर्वी काळजी घेण्याची गरज असतांना लालसेपोटी गुंतवणूकदार आपली जमापूंजी सर्व या कंपनीकडे सुपूर्द करून आता पश्‍चताप करण्याची वेळ या गुंतवणूकदारांवर आलेली आहे. अतिशय नियोजनबद्धरित्या ही फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणात तिघांना अटक केली असली तरी, या तिघांचा फायदा घेवून या आमिषे दाखवून फरार झालेले कोण, त्यांच्या मुसक्या आवळण्याची खरी गरज आहे.

COMMENTS