Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार्यकारी सेवा संस्थांनी स्वावलंबी होण्याची गरज ः  नितीनराव औताडे

पोहेगांव बुद्रुक नं 2 विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

कोपरगाव शहर ः स्व. चांगदेवराव गणपतराव औताडे यांनी 1969 साली पोहेगांव बुद्रुक नं 2  विकास सोसायटीची स्थापना करून शेतकरी व सर्वसामान्य सभासदांना अल

नव्या पिढीची कविता प्रेरणा देणारी : कवी प्रकाश घोडके
संगमनेर शहरातील शांतता बिघडवणाऱ्यांचा उद्देश सफल होऊ देऊ नका – आमदार थोरात
राहाता नगरपालिका पाणी साठवण तलावात पाच टक्केच पाणीसाठा

कोपरगाव शहर ः स्व. चांगदेवराव गणपतराव औताडे यांनी 1969 साली पोहेगांव बुद्रुक नं 2  विकास सोसायटीची स्थापना करून शेतकरी व सर्वसामान्य सभासदांना अल्प व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देत आधार दिला. पन्नास वर्ष संस्थेचे कामकाज पाहत असताना त्यांनी अत्यंत काटेकोरपणे संस्था सांभाळली, ती टिकवली व वाढवली. त्यांचा सहकारी क्षेत्रावर गाढा अभ्यास होता. त्यांच्या शिकवणीवरच आज संस्थेची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. संस्थेचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. सोसायट्यानी बँकेवर अवलंबून न राहता  विविध व्यवसा्याच्या माध्यमातून आपले स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत्र वाढवणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन संस्थेचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी शनिवार दि 21 सप्टेंबर रोजी पोहेगाव बुद्रुक नंबर 2 विकास सोसायटीच्या 55 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र औताडे, उपाध्यक्ष अशोक वाके, संचालक सुनिल बोठे, अनिल औताडे, दिलीप औताडे, संजय औताडे, कैलास औताडे, अनिल औताडे, सुनिल हाडके, सिमाताई औताडे, यमुनाबाई लांडगे, सोमनाथ सोनवणे, मधुकर भालेराव, तसेच सभासद उपसरपंच अमोल औताडे राजेंद्र औताडे, सुनिल औताडे, अशोक औताडे, चांगदेव पाचोरे, नितीन आभाळे, गणेश गोसावी, आण्णासाहेब औताडे, रंगनाथ देशमुख, गोरक्षनाथ जोंधळे, भीमा औताडे, सुखदेव भोजने, सचिव संदीप फटांगरे आदी सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र औताडे यांनी संस्थेने चालू आर्थिक वर्षात 1 कोटी 56 लाख रुपये कर्ज वितरित केले आहे. संस्थेच्या सभासद संखेत वाढ झाली असून नव्यानेच 49 सभासद नोंदणी झाली आसल्याचे  सांगितले तर, संचालक दिलीप औताडे यांनी चालू आर्थिक वर्षात 10 लाख 428 रुपये नफा मिळवला असून दिवाळीपूर्वीच सभासदांना 10 टक्के लाभांश वाटप केले जाणार असल्याचे सांगितले तर संस्थेचे सचिव संदीप फटांगरे यांनी सूत्रसंचालन करत आभार मानले.

पोलिस उपनिरीक्षक झालेल्या अभिषेक जोंधळे यांचा सत्कार – एमपीएससी परीक्षेत राज्यात 9 वा क्रमांक मिळवत पोलीस  उपनिरीक्षक झालेले अभिषेक जोंधळे यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेस सहकार भूषण श्री चांगदेवराव गणपतराव पाटील औताडे विकास सोसायटी असे नाव देण्याचा ठराव संमत केल्याबद्दल नितीनराव औताडे यांनी सभासदांचे आभार मानले. 

COMMENTS