Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्त्रियांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठाची गरज -कविताताई आव्हाड

पाथर्डीत मैत्रेयी ग्रुप तर्फे ’ती’चा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन

पाथर्डी ः भारतीय संस्कृतीमध्ये स्रियांचा नेहमीच सन्मान करण्यात आला असला तरीही पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना अधिकारांच्या बाबत दुय्यम स्थान देण्य

५५० अनाथ, गोरगरीब मुलींचे लावले विवाह… शेख खलील चौधरी यांना जीवनगौरव पुरस्कार
राहुरीत आजी-माजी आमदारांमध्ये रंगला कलगीतुरा
नेवाशात तिघांची 35 लाखांची फसवणूक

पाथर्डी ः भारतीय संस्कृतीमध्ये स्रियांचा नेहमीच सन्मान करण्यात आला असला तरीही पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना अधिकारांच्या बाबत दुय्यम स्थान देण्यात आले आहे. सध्या या मानसिकतेत झपाट्याने बदल होत असला तरीही महिलांचा यथोचित आदर करणे आजच्या समाजाचे परम कर्तव्य आहे.विश्‍वनिर्मिती करणारी स्री उपेक्षित राहिली असून तिच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठाची गरज आहे असे प्रतिपादन मैत्रेयी ग्रुपच्या अध्यक्षा कविताताई आव्हाड यांनी केले. त्या येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान व मैत्रेयी ग्रुपतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ’ती’ चा सन्मान कार्यक्रमात बोलत होत्या.
व्यासपीठावर दर्शना कुचेरीया, राखी लुणावत, सारिका बाफना, रुपाली खाबिया, ताराबाई बंग, दिपालीताई बंग, वैशाली गर्जे, वैशाली परदेशी, निर्मला वाघेरे, योगिनी क्षीरसागर, नंदाताई आव्हाड उपस्थित होत्या. कविता आव्हाड पुढे म्हणाल्या, अनादी काळापासून ते आजच्या डिजिटल युगामध्ये स्री  कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. आई, बहीण, पत्नी या विविध रूपांमध्ये ती आपल्याला कायम शक्ती बनून प्रेरणा देते. केवळ घरामध्ये न राहता आपल्या कार्याने स्त्रिया आज विविध क्षेत्रांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. गेली पंधरा वर्षांपासून अशाच स्त्रीशक्तीचा सन्मान मैत्रेयी ग्रुपच्या माध्यमातून केला जात असून यावेळी नवज्योत विद्यालयातील 25 निवासी मुकबधीर मुलींचा गौरव करताना अत्यंत आनंद होत आहे अशा त्या शेवटी म्हणाल्या. यावेळी मैत्रेयी ग्रुपच्या व्यासपीठावर महाविद्यालयीन विद्यार्थिनीनी विविध कलागुण सादर केले. पालक व विद्यार्थिनींसाठी प्रश्‍नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विजेत्या महिलांना आकर्षक पारितोषिक देण्यात आले. मुकबधीर मुलींनी सादर केलेल्या ’खूप खूप शिकून मोठं व्हायचंय’ या गाण्यास उपस्थितांनी भरभरून दाद दिली. त्यांना शालेय व जीवनावश्यक साहित्यांनी गौरविण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेखा चेमटे, सुत्रसंचालन डॉ. वैशाली आहेर, रेश्मा सातपुते, कू. निलिमा शेटे तर आभार मनीषा गायके यांनी मानले.

COMMENTS