Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संविधान स्वातंत्र्याच्या भट्टीतून निघालेले अमृत ! संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : संविधान ही एका पक्षाची देणगी असल्याचे वातावरण देशात निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संविधान निर्मितीत अनेकांची भूमिका विसर

बेकायदा गाळ्याविरोधात ग्रामस्थाचा पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न
पारनेर तालुक्यातील वारकर्‍यांची आरोग्य तपासणी
नक्षलग्रस्त भागातील युवकांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आणले शिक्षणाच्या प्रवाहात

नवी दिल्ली : संविधान ही एका पक्षाची देणगी असल्याचे वातावरण देशात निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संविधान निर्मितीत अनेकांची भूमिका विसरली गेली आहे. आपले संविधान हे स्वातंत्र्याच्या संविधानाच्या भट्टीतून निघालेले अमृत आहे. हा आपला स्वाभिमान असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी लोकसभेत केले. भारतीय संविधानाला 26 जानेवारी रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या विशेष चर्चेच्या वेळी ते बोलत होते.
यावेळी राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, या देशात एक राज्य होते जिथे संसद आणि राज्यघटनेचे कायदे लागू केले जात नव्हते. आम्ही तिथेही सर्वकाही अंमलात आणले. आता निवडणुकाही झाल्या आणि विक्रमी मतदान झाले. हिंसाचाराची एकही घटना घडली नाही. संसदेत संविधानावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांच्या चर्चेपूर्वी शुक्रवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. वास्तविक, सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्‍वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. याविरोधात भाजप खासदार राधामोहन दास अग्रवाल यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे. त्यावरून गदारोळ सुरू झाला. यादरम्यान धनखड आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात जोरदार वादावादी झाली. अध्यक्ष जगदीप धनखड म्हणाले, ’मला खूप त्रास झाला. मी शेतकर्‍याचा मुलगा आहे, मी झुकत नाही. विरोधकांनी संविधानाचे तुकडे केले असा आरोप धनखड यांनी यावेळी केला. याला उत्तर देताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ’तुम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यांचा अपमान करता. तुमचे काम सभागृह चालवणे आहे. तुमची स्तुती ऐकायला आम्ही आलो नाही. तुम्ही शेतकर्‍याचे पुत्र असाल तर मी मजुराचा मुलगा आहे. तुम्ही माझा आदर करत नसाल तर मी तुमचा आदर का करू? असा सवाल उपस्थित केला. लोकसभेत पुढे बोलतांना राजनाथ सिंह म्हणाले की, तुम्ही जातीची जनगणना केलीत तर कोणत्या जातीला किती आरक्षण मिळणार तेही सांगा. तुम्ही ब्लू प्रिंट आणा आणि मी म्हणतो की त्यावर संसदेतही चर्चा व्हायला हवी. काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही राज्यघटनेचे मूळ स्वरूप बदलू देणार नाही. आणीबाणीच्या काळोख्या काळातही राज्यघटनेला दुखावण्याच्या प्रत्येक प्रयत्नाला आम्ही विरोध केला. मी 18 महिने तुरुंगातही राहिलो. माझी आई मरण पावली तेव्हा त्यांना मुखाग्नी देण्यासाठीही पॅरोलही देण्यात आला नव्हता, असा आरोप देखील राजनाथ सिंह यांनी यावेळी केला. पुढे ते म्हणाले की, संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका होती हे आपण जाणतो. संविधानाच्या अंमलबजावणीनंतर डॉ. आंबेडकर मूलभूत हक्कांसाठी लढत राहिले. भविष्यात त्याचे घातक परिणाम होतील, असे ते म्हणाले होते. काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांकडून मुलभूत हक्कांची पायमल्ली होत असल्याबद्दल ते बोलले होते, ज्याची पुनरावृत्ती काँग्रेसने सत्तेवर केली होती. पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी शपथ घेतल्यास त्यांचे सर्व गुन्हे माफ होतील, अशी दुरुस्ती करण्यात आली. हा दुरुपयोग होता. या घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्षांवर आणला. जनतेला प्रजा बनवण्याचा हा डाव नव्हता का, ही हुकूमशाही नव्हती का? आज त्याच पक्षाचे लोक असे बोलत आहेत. राजकारण करायचे असेल तर जनतेला डोळ्यासमोर ठेवून करा. त्यांच्या डोळ्यात धूळ फेकून नाही.

COMMENTS