Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खेड्यांच्या विकासातून राष्ट्राची बांधणी होते : सरपंच भोसले

बेलापूर : देशाच्या विकासासाठी युवकांनी सदैव सेवाभावी वृत्तीने तत्पर राहिले पाहिजे. खेड्यापाड्यांच्या सर्वांगीण विकासातूनच राष्ट्राची बांधणी होते.

Belapur : बेलापुरात भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सव सुरु (Video)
बेलापूर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी कुऱ्हे 
पश्‍चिमेकडील पाणी गोदावरीत वळवून तूट भरून काढणार

बेलापूर : देशाच्या विकासासाठी युवकांनी सदैव सेवाभावी वृत्तीने तत्पर राहिले पाहिजे. खेड्यापाड्यांच्या सर्वांगीण विकासातूनच राष्ट्राची बांधणी होते. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आपला वेळ, तन-मन-धन मानवकल्याणासाठी अर्पण केला पाहिजे, असे प्रतिपादन उंबरगावच्या सरपंच सुप्रिया भोसले यांनी केले.

येथील कला व वाणिज्य महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उंबरगाव येथील विशेष श्रम संस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड होते.

 यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चंद्रशेखर डावरे, अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विराज पाटील भोसले, भाऊसाहेब भोकरे, ग्रामविकास अधिकारी तायडे,  कुणाल भालदंड, सोसायटीचे चेअरमन अशोक बर्गे, योगेश बनकर, माजी उपसरपंच राजेंद्र ओहोळ,  प्राचार्य प्रो. डॉ. गुंफा कोकाटे,  प्रा. चंद्रकांत कोतकर, प्रा. रूपाली उंडे, प्रा. डॉ. बाबासाहेब पवार, प्रा. अशोक थोरात, शेलार आदी उपस्थित होते. 

प्राचार्य प्रो. डॉ. गुंफा कोकाटे यांनी मनोगतात सांगितले की, राष्ट्रविकासाचा दिवा तेजाळण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने ग्रामविकासाचा दिवा लावला पाहिजे. ‘झोपलेल्या गावासाठी मला जागं व्हायचं आहे’ या भावनेने काम केले, तरच खरा विकास साध्य होईल.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने शिबिरास सुरुवात झाली. रासेयो स्वयंसेवक हर्षदा काळे, प्रेरणा तेलोरे व प्राजक्ता वाडकर यांनी विद्यापीठ गीत सादर केले. प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत कोतकर यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. बाबासाहेब पवार यांनी करून दिला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक माने यांनी केले. आभार प्रा. रूपाली उंडे यांनी मानले.

COMMENTS