Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोयना धरणाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक बदलला श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

पाटण / प्रतिनिधी : कोयना धरणाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक बदलून श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे नामकरण करण्यात आले आहे. या ऐतिहासिक

वडी येथे मांडुळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
LOK News 24 I दखल काँग्रेसची बदनामी सुरु l
माजी खा. राजू शेट्टी यांची आक्रोश यात्रा आज सांगलीत

पाटण / प्रतिनिधी : कोयना धरणाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक बदलून श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे नामकरण करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे कोयना परिसरासह पाटण तालुक्यात समाधान व अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. गेल्या 10 वर्षांपासून या नामकरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याची भावना भाजपा पाटण तालुकाध्यक्ष नंदकुमार सुर्वे यांनी व्यक्त केली. यामधे लोकमंथनच्या सातत्याने वृत्तांच्या केलेल्या पाठपुराव्याचा अखेर सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे मत सुर्वे यांनी व्यक्त केले.
सुर्वे म्हणाले, कोयना धरणाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे नामकरण करण्यात यावे. या मागणीची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गांभीर्याने घेत सविस्तर अहवाल मागविला. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांच्या मागणीनुसार दि. 16 एप्रिल 2025 रोजी मंत्रालयात जलसंपदा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली. त्यानंतर 23 डिसेंबर 2025 रोजी प्रत्यक्ष भेटीनंतर 26 डिसेंबर 2025 रोजी जलसंपदा मंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य जलसंपदा महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना धरणाच्या नावात तातडीने बदल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कोयना धरणाचे अधिकृत नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे करण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा पाटण विधानसभा नेते सत्यजितसिंह पाटणकर, युवा नेते याज्ञसेन पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर, राजाभाऊ शेलार यांनी विशेष सहकार्य लाभले तसेच कार्यकारी संचालक गुणले, मुख्य अभियंता धुमाळ, अधीक्षक अभियंता काटकर, नाईक साहेब, कार्यकारी अभियंता पोतदार, कार्यकारी अभियंता रासनकर, उपअभियंता जाधव यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने याचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर योग्य पध्दतीने पाठविण्यात आला होता.

COMMENTS