Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नदीपात्रात आढळलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे गूढ उकलले

संपत्तीच्या वादातून भावाने व वहिनीने केला खून

पुणे : पुण्यात काही दिवसांपूर्वी खराडी येथे मुळा मुठा नदी पात्रात शिर नसलेला महिलेचा मृतदेह आढळला होता. या घटनेने खळबळ उडाली होती. या मृतदेहांचे

देवळाली नगरपालिकेकडून स्वच्छ पंधरवाडा अभियान
घर घर लंगर सेवेने साजरी केली रस्त्यावरील वंचितांची दिवाळी वंचितांना फराळचे वाटप
चांदोली अभयारण्यात वणवा; आग विझविण्याचे वन्यजीव यंत्रणेचे केविलवाणा प्रयत्न; वनव्याचे सत्र सुरू; महिन्याभरातील दुसरी घटना

पुणे : पुण्यात काही दिवसांपूर्वी खराडी येथे मुळा मुठा नदी पात्रात शिर नसलेला महिलेचा मृतदेह आढळला होता. या घटनेने खळबळ उडाली होती. या मृतदेहांचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. संपत्तीच्या वादातून या महिलेची तिच्या भावाने आणि वाहिनीने हत्या केल्याचं उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केले आहे.
सकिना खान असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अशपाक खान आणि वहिनी हमीदा अशी आरोपींची नावे आहेत. झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सख्खा भाऊ व वहिनीने सकीनाची हत्या केली. घरातच शास्त्राच्या साह्याने तिच्या शरीराचे तुकडे केले. यानंतर पुण्यात सुरू असलेल्या पावसाचा फायदा घेत तिचा मृतदेह संगमवाडी नदीपात्रात फेकून दिला होता. त्यानंतर सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती शेजार्‍यांना दिली. पुण्यात खराडी येथे नदीपात्रात 26 ऑगस्ट रोजी मुळा मुठा नदीपात्रात डोक व हात-पाय नसलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. पुण्यातील पाटील इस्टेट भागत सकिना भाऊ आणि वाहिनीसोबत राहत होती. ज्या खोलीत ते राहत होते ती सकिना हिच्या नावावर होती. तिच्या भावाने सकिना हिला खोली नावावर करून देण्यास सांगितले होते. दरम्यान, तिने खोली नावावर करून देत नसल्याने त्याने तिची हत्या केली. यानंतर घरातच तिच्या मृतदेहांचे तुकडे करून ते नदीपात्रात फेकून दिले. यानंतर सकिना ही घरातून निघून गेल्याच बनाव त्यांनी रचला. बरेच दिवस सकिना दिसली नसल्याने शेजार्‍यांचा संशय बळावला. त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दिली. पोलिस धड नसलेल्या मृतदेहाचा शोध घेत असतांना बेपत्ता नागरिकांची माहिती घेत होते. यातून हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी सकिनाचा भाऊ अशपाक खान व वहिनी हमीदा यांना अटक केली असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. सकिना ही खोली नावावर करून देत नसल्याने तसेच तिला ते घरातून निघून जाण्यास सांगत असतांना देखील ती जात नसल्याने त्यांनी तिचा खून केल्याची कबूली आरोपींनी दिली आहे.

COMMENTS