Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगोल्यात पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाने खळबळ

सोलापूर प्रतिनिधी - सांगोल्यात पोलीस उपनिरीक्षकाची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी पाठीमागून धारदार शस्त्राने वार करून

पाकिस्तानात क्रूरतेचा कळस.
राजकीय वैमनस्यातून नराधमांनी आख्ख्या कुटुंबाला संपवलं  
कल्याणमध्ये क्लासहून घरी परतणार्‍या तरुणीची हत्या

सोलापूर प्रतिनिधी – सांगोल्यात पोलीस उपनिरीक्षकाची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी पाठीमागून धारदार शस्त्राने वार करून PSI चा खून केला. जेवण झाल्यावर पोलीस उपनिरीक्षक सुरज विष्णू चंदनशिवे हे शतपावलीसाठी गेले असता घरी परतलेच नाहीत. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. पीएसआय सुरज चंदनशिवे हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वासूद येथील केदारवाडी येथील रहिवासी होते. बुधवारी रात्री जेवणानंतर ते केदारवाडी रोडवरशतपावली करण्यासाठी गेले असताना रात्री 11 वाजेच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी पाठीमागून त्यांच्या डोक्यात वार करुन त्यांचा खून केल्याचा आरोप आहे. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून नातेवाईकांनी शोध घेतला असता वासूद- केदारवाडी रोडनजीक त्यांचा मृतदेह आढळून आला.PSI सुरज यांची पोलीस दलातील कारकीर्द वादग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. 2018 मध्ये वारणानगर येथील 9 कोटी रुपये चोरीच्या प्रकरणात सुरज चंदनशिवेंचे नाव समोर आले असताना त्यांना या प्रकरणात पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. एका वर्षापूर्वी हे निलंबन रद्द करून सांगली मुख्यलायत ते रुजू झाले होते. सांगली मुख्यालयात कार्यरत असताना पुन्हा एकदा दोन महिन्यांपूर्वी त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. पीएसआय सूरज चव्हाण यांचा मृतदेह सांगोला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले आहे. आणि पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येचा पोलीस तपास सुरू आहे.

COMMENTS