Homeताज्या बातम्यादेश

डास चावला म्हणून खासदाराने थांबवली ट्रेन

डब्ब्याच्या सफाईसाठी अधिकारी तात्काळ दाखल

उत्तर प्रदेश- उत्तर प्रदेशातून डास चावल्याची एक रंजक घटना समोर आली आहे. इटाहचे खासदार राजवीर सिंह लखनऊच्या चारबाग रेल्वे स्थानकावरुन दिल्लीला

अखेर मुंबईतील कॉलेजच्या हिजाब बंदीला स्थगिती
सैन्यातील 34 महिला अधिकार्‍यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
सीमावादाला कर्नाटकी फोडणी

उत्तर प्रदेश- उत्तर प्रदेशातून डास चावल्याची एक रंजक घटना समोर आली आहे. इटाहचे खासदार राजवीर सिंह लखनऊच्या चारबाग रेल्वे स्थानकावरुन दिल्लीला निघालेल्या गोमती एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांना डास चावला. मग काय…खासदाराने तक्रार नोंदवली अन् प्रशासनात खळबळ उडाली. घाईगडबडीत रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि गाडी थांबवून संपूर्ण बोगीमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. बोगीची साफसफाई झाल्यानंतरच गाडी पुढे रवाना करण्यात आली. खासदारासोबत प्रवास करणाऱ्या मान सिंह यांनी ट्विटरवरुन तक्रार नोंदवली. खासदार राजवीर सिंह ट्रेनच्या फर्स्ट एसी डब्यात प्रवास करत आहेत. ट्रेनचे बाथरुम अस्वच्छ असून डास चावत आहेत. त्यामुळे खासदारांना बसणेही कठीण झाले आहे, अशी तक्रार त्यांनी केली. या ट्विटनंतर अधिकारी अॅक्शन मोडमध्ये आले आणि ट्रेन उन्नाव येथे थांबवण्यात आली. यानंतर संपूर्ण डबा स्वच्छ करण्यात आला. डास गेल्यानंतर संपूर्ण बोगीवर फवारणी करण्यात आली. यानंतर उन्नाव रेल्वे स्थानकावरून ट्रेन दिल्लीला रवाना करण्यात झाली. रेल्वेच्या या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

COMMENTS