आईला मारहाण करून घराबाहेर हाकलले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आईला मारहाण करून घराबाहेर हाकलले

मुलगा व दोन सुनांवर राहुरीत गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : जन्म दिलेल्या आईला मुलाने व सुनांनी घरातून बाहेर हाकलून दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील आंबी दवणगांव येथे घडली आहे. याप्रकरणी मु

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्रांतीमध्ये मोठे योगदान
महाविद्यालयाच्या विकासात माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे – अ‍ॅड. देशमुख
पारंपरिक लावणीची पताका फडकवत ठेवा. :- प्रा. डॉ. शेषराव पठाडे

अहमदनगर/प्रतिनिधी : जन्म दिलेल्या आईला मुलाने व सुनांनी घरातून बाहेर हाकलून दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील आंबी दवणगांव येथे घडली आहे. याप्रकरणी मुलगा व दोन सुनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालनबाई सखाराम भोसले (वय 65, रा. आंबी दवणगांव, ता. राहुरी) या महिलेचा मुलगा शरद भोसले व सविता भोसले आणि सुनीता भोसले यांनी या महिलेस मारहाण केली. नंतर तिला जेवण न देता तसेच तिचा सांभाळ न करता तिला घराच्या बाहेर हकलून दिले. पुन्हा घरी आली तर तुला सोडणार नाही, असा दम दिला. त्यानंतर मालनबाईने राहुरी पोलिसात धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून मुलगा शरद सखाराम भोसले व सुना सविता शरद भोसले, सुनीता दिनेश भोसले (सर्व रा. आंबी दवणगांव, ता.राहुरी) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रभाकर शिरसाठ करीत आहेत.

COMMENTS