Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आईने दिले मुलाला सराट्याने चटके.

अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरुन आईविरुद्ध गुन्हा दाखल

बुलढाणा प्रतिनिधी- सेंट जोसेफ या शाळेतील आठव्या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्यास परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्याच्या आईने त्यास चक्क सराट

1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीची निर्दोष सुटका
राहुल गांधींच्या त्या स्टेटमेंटची राज ठाकरेंनी उडवली खीली | LOKNews24
कावड यात्रेवर हल्ल्याची शक्यता, सतर्कतेचा इशारा

बुलढाणा प्रतिनिधी- सेंट जोसेफ या शाळेतील आठव्या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्यास परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्याच्या आईने त्यास चक्क सराटा गरम करून पाठीवर चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा शहरात 2 ऑगस्टला उघडकीस आला होता. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरून त्याच्या आईविरुद्ध बाल संरक्षण अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित मुलाला घराबाहेर काढल्यानंतर तक्रारदार विद्यार्थ्याने घडलेली हकीकत आधी मित्राच्या आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर हे प्रकरण बालकल्याण समितीकडे गेले. बालकल्याण समितीने त्या विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यास समितीच्या वसतिगृहात ठेवले आहे.

COMMENTS