Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरातील कपाटातून मावस बहिणीनेच लंपास केले दागिने 

कल्याण प्रतिनिधी -  पर्स मधील चावी चोरत मावस बहिणीने घरातील कपाटातून चारशे ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याची घटना डोंबिवली येथे घडली. दरम्यान चोवीस

महावितरणची डिजीटायजेशनकडे वाटचाल : ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्यांचे प्रमाण वाढले
हृतिक रोशन- दीपिकाच्या ‘फायटर’ चा टीझर रिलीज
मुंबईसह ठाण्यातील अनेक भागांत वीज पुरवठा खंडित

कल्याण प्रतिनिधी –  पर्स मधील चावी चोरत मावस बहिणीने घरातील कपाटातून चारशे ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याची घटना डोंबिवली येथे घडली. दरम्यान चोवीस तासाच्या आत मानपाडा पोलिसांनी या घटनेची उकल करत मावस बहिणीला ताब्यात घेतले आहे. सिमरन पाटील असे या आरोपीचे नाव असून त्या फिर्यादी पलावा येथे राहणाऱ्या प्रिया सक्सेना यांची मावस बहीण असल्याचे समोर आले आहे. 13 जानेवारी रोजी प्रिया सक्सेना या एका कार्यक्रमासाठी कामोठे नवी मुंबई येथे गेल्या होत्या. याचवेळी मावस बहीण सिमरन यांनी प्री यांच्या पर्स मधून घराची व तिजोरीची चावी हळूच काढून घेतली होती.

त्यानंतर आरोपी सिमरन ही प्रिया यांच्या घरी रीक्षेने पोहचली. कोणालाही संशय येऊ नये यासाठी प्रिया यांचा वन पीस त्यांनी परिधान केला. नव्हे तर सीसीटीव्ही मध्ये आपला चेहरा दिसू नये यासाठी त्यांनी चेहऱ्याला स्कार्फ बांधला. त्यानंतर कोरलेल्या चावीचा आधार घेत ती घरात शिरली. लागलीच कपाताकडे जात तिजोरीच्या चावीने त्यांनी तिजोरी उघडली. यावेळी प्रिया यांच्या तिजोरीत जवळपास 400 ग्रॅम सोन्याचे दागिने होते ते तिने चोरी केले. घरी आल्यानंतर प्रिया यांना आपल्याकडे चोरी झाल्याचे समजताच त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. सीसीटीव्ही चा आधार घेत पोलिसांनी 24 तासाच्या आत सिमरन यांना अटक केली. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे ,पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ ,सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे यांनी ही कारवाई केली. अधिक तपास मानपाडा पोलीस ठाणे करत आहे.

COMMENTS