मुंगुसाने झाडावर चढलेल्या सापाची केली शिकार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंगुसाने झाडावर चढलेल्या सापाची केली शिकार

झाडावरून खाली खेचून मुंगुस सापाला घेऊन पसार

मुंगूस आणि सापाचे  वैर सर्वांनाच माहित आहे. मुंगूस बघितला तर साप पळून जाण्याचा प्रयत्न करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय

मिझोराममध्ये मोठी दुर्घटना, रेल्वे पूल कोसळून १७ जणांचा मृत्यू
गजबजलेल्या चौकात जळतोय कचरा
स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेतून उलगडणार सर्जिकल स्ट्राइकचा थरार| फिल्मी मसाला | LokNews24 |

मुंगूस आणि सापाचे  वैर सर्वांनाच माहित आहे. मुंगूस बघितला तर साप पळून जाण्याचा प्रयत्न करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत मुंगुसाने झाडावर चढलेल्या सापाची शिकार केलीये. व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक साप झाडावर चढलेला दिसत आहे. त्याचवेळी एक मुंगूस या सापाची शिकार करण्यासाठी झाडाखाली उभा आहे.त्यातच झाडाच्या फांदी लहान असल्याने मुंगूसाला सापाची शिकार करणं सोपं जाते. झाडाच्या फांदीवर साप लपत असल्याचं दिसताच मुंगूस अचानक उंच उडी घेतो आणि सापाला फांदीवरून खाली खेचण्याचा प्रयत्न करतो.दरम्यान, मुंगूसाच्या तोंडात फणा आल्यानंतरही साप प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो. शेपटीने फांदी घट्ट पकडत तो कसाबसा या मुंगूसाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो. मात्र तरी देखील मुंगूस काही सापाला सोडत नाही. झाडावरून खाली खेचल्यानंतर मुंगूस सापाला घेऊन पळून जातो.

COMMENTS