Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 हात चलाखीने एटीएममधून पैसे चोरले, बँक कर्मचाऱ्यांनी केले पोलिसांच्या स्वाधीन

जालना प्रतिनिधी - हात चलाखीने एटीएममधून पैसे चोरणाऱ्या आरोपीला बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. जालना शहरातील रेल्वेस्टेशन

तृतीयपंथी मतदारांनी घेतली 100 टक्के मतदानाची शपथ 
मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू; सर्व मृतदेहांची ओळख पटली
मुस्लिम समाजाच्या वतीने ऐक्याचा संदेश देणारी पवित्र रमजान ईद साजरी

जालना प्रतिनिधी – हात चलाखीने एटीएममधून पैसे चोरणाऱ्या आरोपीला बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. जालना शहरातील रेल्वेस्टेशन रोडवरील ठक्कर कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली. 4 ते 5 वेळा या आरोपीने एटीएम वापरून हातचलाखीने रक्कम काढल्याचा प्रकार बँकेच्या मॅनेजरच्या लक्षात आला. त्यामुळं एटीएममध्ये कमी रक्कम आढळून आल्यानं बँक मॅनेजरनं सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितावर पाळत ठेवली होती. 20 वर्षीय सुशीलकुमार साहू असं या आरोपीचं नाव असून तो उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहे.

या आरोपीने 5 वेळा रक्कम काढत बॅंकेला 70 हजार रुपयांना चुना लावला. अखेर संशयित सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून निश्चित झाल्यानंतर तो पुन्हा पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनकडे गेला असता बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शटर खाली करत त्याला कोंडून घेतलं आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतलं. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली केलं. या प्रकरणी आता कदीम जालना पोलीस अधिक तपास करत आहेत.

COMMENTS