Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदारांनी धरला दिंडीतील वारकर्‍यांसमवेत फुगडी व फेर

राहुरी ः राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातून पंढरपूर येथे जाणार्‍या पायी दिंडी सोहळ्यास आज आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी भेटी देऊन वारकर्‍यांशी सं

शुक्र जन्मोत्सव व शिवपार्वती विवाह सोहळ्याचे सोमवारी आयोजन
सत्कार्याच्या कार्याचा सत्कार होतो तेव्हा सेवेला बळ मिळते – प्राचार्य शेळके
जामखेडमध्ये हप्ता नाकारल्याने कलाकेंद्रात धूडगुस

राहुरी ः राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातून पंढरपूर येथे जाणार्‍या पायी दिंडी सोहळ्यास आज आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी भेटी देऊन वारकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी आमदार तनपुरे यांनी दिंडीतील वारकर्‍यांचा समावेश फुगडी आणि टाळांच्या व अभंगाच्या तालावर फेर धरला. काही काळ पवित्र अशा वारकरी संप्रदायाची भगवी पताका घेऊन पदयात्रा देखील केली.
गेल्या काही काळापासून राहुरी पाथर्डी आणि नगर तालुक्यातील पंढरपूरला जाणार्‍या भाविकांच्या दिंडीत भेटीगाठी घेण्याचा उपक्रम तनपुरे यांनी सुरूच ठेवला आहे. या उपक्रमाची चर्चा राहुरी नगर अन पाथर्डी तालुक्यात सुरू आहे. आमदार तनपुरे यांनी वृद्धेश्‍वरच्या रघुनाथ महाराज उंबरेकर ता.पाथर्डी, तुकाराम महाराज प्रतिष्ठान-उंबरे, गुरुदेव पायी दिंडी उंबरे ता. राहुरी, मोरेश्‍वर भैरवनाथ-शेंडी पोखर्डी ता. नगर, कोळी काकी-ब्राह्मणी ता.राहुरी, गोरक्षनाथ महाराज-डोंगरगण मांजरसुंबा ता. नगर, राष्ट्रसंत तनपुरे महाराज- वैजूबाबुळगाव ता. पाथर्डी, कानिफनाथ महाराज-जवखेडे खालसा ता.पाथर्डी, हरेश्‍वर संस्थान-शिराळ चिचोंडी ता. पाथर्डी आदी दिंड्या व वारकर्‍यांना यावेळी तनपुरे यांनी भेट दिली. आमदार तनपुरे यांनी यावेळी वारकर्‍यांच्या समवेत फुगडी घालून फेर धरला. वारकरी संप्रदायाची पवित्र असे भगवी पताका देखील हाती घेतली. त्र्यंबकेश्‍वर ते पंढरपूर या पवित्र पालखी मार्गातील सोलापूर जिल्ह्यातील जेऊर, कन्हेर, वेणेगाव ता. करमाळा दहिवले ता. माढा आदी ठिकाणी दिंड्यांना भेटी दिली. यावेळी आमदार तनपुरे यांच्या समवेत राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष भारत तारडे, युवक अध्यक्ष ज्ञानेश्‍वर बाचकर, अमोल वाघ, मचे, सुनील पुंड, जालिंदर वामन, अमोल दिघे, सचिन तनपुरे आदी उपस्थित होते.

COMMENTS