Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिळवंडीत क्रांतीसुर्य राघोजी भांगरे यांचा स्मृतीदिन उत्साहात

अकोले ः अकोले तालुक्यातील आदर्श गाव शिळवंडी येथे मोहणीराज आदिवासी प्रतिष्ठान शिळवंडी या माध्यमातून क्रांतीसुर्य राघोजी भांगरे यांचा स्मृतिदिन मोठ

मंत्री विखेंच्या जनता दरबारातून प्रश्‍नांची सोडवणूक
नगर अर्बनला फसवणारा गायकवाड अखेर पकडला
पत्नीला चक्क पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना| LOK News24

अकोले ः अकोले तालुक्यातील आदर्श गाव शिळवंडी येथे मोहणीराज आदिवासी प्रतिष्ठान शिळवंडी या माध्यमातून क्रांतीसुर्य राघोजी भांगरे यांचा स्मृतिदिन मोठ्या धुमधडाक्यात नुकताच साजरा करण्यात आला.सकाळी 7.00 वाजता राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे पुजन करून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
संध्याकाळी 6.00 वाजता राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील तरूणानी अतिशय सुंदर पद्धतीने आदिवासी क्रांतिकारकांची वेशभूषा करून मिरवणुकीत रंगत आणली. स्रीयांनी आदीवासी मानाची फडकी घेऊन मिरवणुकीची शोभा वाढवली.संपुर्ण गावातून वाजतगाजत मिरवणूक मारूती मंदीरासमोर आली. संध्याकाळी 8.00 वाजता आदि. योगेश सारोक्ते यांच प्रोबोधात्मक व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे प्रथम नागरिक सरपंच पूनम ज्ञानेश्‍वर साबळे या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास साबळे यांनी केले तर प्रास्ताविक संजय साबळे शिळवंडीकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी मोहणीराज प्रतिष्ठान शिळवंडी अध्यक्ष गोरक्षनाथ साबळे,बाळू साबळे, विजय साबळे, भागा साबळे, महेश साबळे, बाबासाहेब साबळे, दिपक साबळे, रामनाथ साबळे, चिंधु साबळे (मुंबई),भरत साबळे (नगर), तंटामुक्ती अध्यक्ष निवृत्ती भांडकोळी, उपसरपंच मोहण साबळे लहाणू देठे उपस्थित होते.

COMMENTS