Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यत्र्यांची सभा युतीच्या विजयाची नांदी ठरेल : माजी खा. विखे

अहिल्यानगर : महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. शहरात सर्वत्र युतीला सकारात्मक व चांगले वातावरण निर्माण झाले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा अहिल्यानगरमध्ये होत असल्याने सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. आज (गुरुवार)शहरात होणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा ही युतीच्या विजयाची नांदी ठरणार आहे. या सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.  महानगरपालिका निवडणुकीतील भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अहिल्यानगरमध्ये येत आहेत. त्यांची शहरातील मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील पांजरपोळ मैदानात दुपारी १ वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या स्थळाची पाहणी आज सकाळी माजी खासदार डॉ.सुजय विखे, आमदार संग्राम जगताप, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नितीन कुंकूलोळ, विकी जगताप आदी प्रमुख नेत्यांनी केली. यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहोत. युतीच्या सर्व उमेदवारांसाठी अतिशय चांगले वातावरण निर्माण झाले असून नागरिक उत्स्फूर्तपणे सर्व उमेदवारांना प्रतिसाद देत आहेत. युतीचे ५ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने युतीने या निवडणूकीत आघाडी घेतली आहे. ही आघाडी अशीच पुढे कायम राहील. अनिल मोहिते म्हणाले, पांजरपोळ येथील मैदानात होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून सुमारे पंधरा ते वीस हजार नागरिकांची आसन व्यवस्था येथे करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या सर्व ६७ उमेदवारांसाठी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक गायकवाड, मुकुल गंधे, आकाश सोनावणे, बाबासाहेब सानप, सुजय मोहिते, रुद्रेश आंबाडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपला 20 जानेवारीला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष
कोण होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री …
महायुतीतील भाजप-राष्ट्रवादीत ’तू-तू मैं-मैं’

अहिल्यानगर : महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. शहरात सर्वत्र युतीला सकारात्मक व चांगले वातावरण निर्माण झाले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा अहिल्यानगरमध्ये होत असल्याने सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. आज (गुरुवार)शहरात होणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा ही युतीच्या विजयाची नांदी ठरणार आहे. या सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.

 महानगरपालिका निवडणुकीतील भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अहिल्यानगरमध्ये येत आहेत. त्यांची शहरातील मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील पांजरपोळ मैदानात दुपारी १ वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या स्थळाची पाहणी आज सकाळी माजी खासदार डॉ.सुजय विखे, आमदार संग्राम जगताप, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नितीन कुंकूलोळ, विकी जगताप आदी प्रमुख नेत्यांनी केली.

यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहोत. युतीच्या सर्व उमेदवारांसाठी अतिशय चांगले वातावरण निर्माण झाले असून नागरिक उत्स्फूर्तपणे सर्व उमेदवारांना प्रतिसाद देत आहेत. युतीचे ५ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने युतीने या निवडणूकीत आघाडी घेतली आहे. ही आघाडी अशीच पुढे कायम राहील.

अनिल मोहिते म्हणाले, पांजरपोळ येथील मैदानात होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून सुमारे पंधरा ते वीस हजार नागरिकांची आसन व्यवस्था येथे करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या सर्व ६७ उमेदवारांसाठी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक गायकवाड, मुकुल गंधे, आकाश सोनावणे, बाबासाहेब सानप, सुजय मोहिते, रुद्रेश आंबाडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS