Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई महापालिकेत महापौर भाजपचा होणार : शेलार

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने पुन्हा ए

पाकिस्तानकडून सीमा भागात गोळीबार
चोरी गेलेले साहित्य सिडको ग्रामीण पोलिसांनी सन्मानपूर्वक केले परत
बस दरीत कोसळून 6 जवान शहीद

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने पुन्हा एकदा कंबर कसली असली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे भाजपने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. मुख्य म्हणजे भाजपने मुंबई महापालिकेवर आपले लक्ष केंद्रीत केले असून, त्यादृष्टीने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. मुंबई महापालिकेत पुढील महापौर हा आमचाच असणार असे सांगत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शड्डू ठोकला आहे.
यासंदर्भात बोलतांना आशिष शेलार म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेत आगामी महापौर हा भाजपचाच होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही मुंबई महापालिकेची तयारी केली होती. त्याच्या परिणामी विधानसभेत आम्हाला चांगले यश मिळाले असल्याचे शेलार यांनी सांगितले. मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवू असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS