Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवी मुंबईत महापौर-उपमहापौर बिनविरोध

गणेश नाईक यांची शिंदेंच्या शिवसेनेला धक्कामुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात आज महत्त्वाची उलथापालथ पाहायला मिळाली. महापौर आणि उपमहापौर

लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय
नगरविकास खात्याने जनतेचा विश्‍वासघात केला
बांबूपासून निर्मित उत्पादनांना मॉलमध्ये जागा देण्यासाठी प्रयत्न करणार : मंत्री गणेश नाईक

गणेश नाईक यांची शिंदेंच्या शिवसेनेला धक्का
मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात आज महत्त्वाची उलथापालथ पाहायला मिळाली. महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत दोन्ही पदे बिनविरोध आपल्या ताब्यात घेतली. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) ला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
सुरुवातीला भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दोन्ही पक्षांनी महापौर व उपमहापौर पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, निवडणुकीच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. शिंदे गटाच्या उमेदवारांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आणि निवडणूक प्रक्रिया औपचारिक ठरली. महापौरपदासाठी भाजपच्या सुजाता पाटील तर उपमहापौरपदासाठी दशरथ भगत यांची निवड निश्‍चित झाली. या घडामोडींमुळे नवी मुंबई महानगरपालिकेवरील सत्तेची सूत्रे पूर्णतः भाजपकडे गेली आहेत.

संख्याबळाच्या जोरावर भाजप मजबूत
111 सदस्यांच्या नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपकडे 65 नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत आहे. एका अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्यामुळे हे संख्याबळ 66 वर पोहोचले आहे. या मजबूत संख्याबळामुळे भाजप आधीपासूनच आघाडीवर होता. मात्र, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आखलेली रणनीती निर्णायक ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या प्रभावी नियोजनाचा या निकालावर मोठा प्रभाव असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले आहे.

COMMENTS