शेवगाव ः मराठा समाज आरक्षण मागणीवरून शिर्डीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमावर सकल मराठा समाजाने बहिष्कार टाकल्याचे दिसून आले. शेवगाव

शेवगाव ः मराठा समाज आरक्षण मागणीवरून शिर्डीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमावर सकल मराठा समाजाने बहिष्कार टाकल्याचे दिसून आले. शेवगाव तालुक्याच्या अनेक गावात सभेला जाण्यास आलेल्या बसेस गावागावातून रिकाम्या पाठविण्यात आल्या. तर मंगरुळ येथे बसच्या काचा फोडण्यात आल्या.
रिकाम्या आलेल्या सर्व बसेस पाथर्डी रोडवरील तहसील कार्यालयाजवळ असणार्या शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात लावण्यात आल्या आहेत.तालुक्यात शेवगाव सह इतर आगाराच्या 56 एस.टी.बसेसची सुविधा करण्यात आली होती मात्र सकाळी साडेदहा वाजेपर्यंत जवळपास 35 बसेस परत पाठविण्यात आल्या. गावागावात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरुण आक्रमक झाला होता. त्यांनी गावात सभेसाठी जाणार्या बसेसला अडवले व बसेसवर असणारे सभेचे पोस्टर फाडून त्यांना हाकलून दिले. तालुक्यातील शेवगाव ढोरजळगाव, भातकुडगाव फाटा, वडूलए या ठिकाणी सकल मराठा बांधव आक्रमक झालेला पहावयास मिळाला. या घटनेमुळे तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली. अशाच प्रकारच्या घटना तालुक्यातील ढोरजळगाव व इतर ठिकाणीही पहावयास मिळाल्या. तालुक्यातील बहुतेक शिर्डी कडे जाणारे रस्ते मराठा आंदोलकांनी बंद केले होते.
भातकुडगाव फाट्यावरून बसेस फिरल्या रिकाम्या- शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे सकल मराठा बांधवांनी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांना घेराव घालत शिर्डी कडे जाणार्या बसेस अडवल्यावर त्यांना परत पाठीमागे पाठवण्यात आले. यावेळी मोठी घोषणाबाजी करण्यात आली.
बसेसमुळे विद्यार्थ्यांची कुचंबना- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी बहुतेक बसेस ह्या बुक झालेल्या होत्या. त्यामुळे तालुक्यातून दररोज शहरात अडीच ते दोन हजार विद्यार्थी व विद्यार्थिनी शाळेला येत असतात. परंतु ह्या विद्यार्थ्यांची आज- येण्या जाण्याची मोठी कुचंबना झाल्याची दिसून आली.
पोस्टरवरही शाईफेक- बसेसवर लावण्यात आलेल्या पोस्टरवर आंदोलकांनी शाई फेकल्याच्याही घटना या आंदोलनामध्ये पहावयास मिळाल्या. काही ठिकाणी बसमध्ये लावलेले पोस्टरही आंदोलकांनी फाडले.
COMMENTS