अंबाजोगाई प्रतिनिधी - शहरातील प्रशांत नगर भागात असलेल्या पवन लॉज येथे गुरूवार, दि. 27 जुलै रोजी पावने एकच्या सुमारास अज्ञात पाच जणांनी लॉजचे मॅ
अंबाजोगाई प्रतिनिधी – शहरातील प्रशांत नगर भागात असलेल्या पवन लॉज येथे गुरूवार, दि. 27 जुलै रोजी पावने एकच्या सुमारास अज्ञात पाच जणांनी लॉजचे मॅनेजर उध्दव माणिक शिंदे (वय 49 वर्षे,रा.नागपिंप्री ता.परळी जि.बीड) यांना रूम आहे का? असे विचारून बळजबरीने लॉजमध्ये घुसून चापटा बुक्क्याने मारहाण केली. लॉजमधील लोखंडी खुर्ची मॅनेजर शिंदे यांच्या डोक्यात घातली. तसेच जबरदस्तीने शिंदे यांच्या खिशातील 2800 रूपये काढून घेतले व जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून मॅनेजर उद्धव शिंदे यांच्या फिर्यादीवरून शनिवार, दि.29 जुलै रोजी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात अज्ञात पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाई येथील संतोष लोमटे यांचे मालकिचे पवन लॉज, हे प्रशांत नगर या भागात आहे. लॉजवर तीन वर्षापासून मॅनेजर म्हणून उद्धव माणिक शिंदे हे काम करतात. ते बुधवार,दि. 26 जुलै रोजी नेहमीप्रमाणे त्यांचे रोजचे कामे संपवुन लॉजचे काऊंटर जवळ झोपले होते.गुरूवारी पावने एक वाजणेच्या सुमारास दोन अनोळखी इसम लॉजचे काचाचा दरवाजा उघडुन आतमध्ये आले व त्यांनी शिंदे यांना उठवून रूम आहे का असे विचारले असता त्यांना काही बोलण्या अगोदर त्यातील एक जण ज्याचे अंगावर काळया रंगाचे जॅकेट घातलेले होते त्याने शिंदे यांना चापटा-बुक्कयाने मारहाण केली व शेजारी ठेवलेली लोखंडी खुर्ची शिंदे यांच्या डोक्यात घातली. ते अज्ञात इसम शिंदे यांना काउंटरची चावी मागू लागले. त्यावेळी अन्य एक जण लॉजचे मेन गेटजवळ उभा होता. शिंदे हे बाहेर जात असताना दारात उभा असलेल्या एकाने त्यांना आतमध्ये ढकलले. बाहेर जावू दिले नाही. शिंदे यांनी बाहेर असलेला वाचमन राख यास मदतीसाठी आवाज देत असताना काळया जॅकेटवाल्या इसमाने शिंदे यांना पकडुन त्यांच्या खिशातील लॉजचे रुम भाडयाचे 2800 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. कोणाला काही सांगितले तर जीवे मारुन टाकीन अशी धमकी शिंदे यांना दिली. ते दोघे इसम लॉजचे बाहेर गेले. शिंदे हे तातडीने बाहेर आल्यानंतर त्यांना लॉज समोर एक काळया रंगाची केटीएम गाडी क्रमांक एम.एच24.3521 यावर एक पांढरे रंगाचा शर्ट घातलेला इसम गाडीवर बसलेला व दुसरे एका पांढरे रंगाचे स्कूटीवर असे दोन इसम बसलेले दिसले. बाहेरील तीन इसमांनी वॉचमन राख यास धमकावुन मध्ये जावु नकोस अन्यथा तुला जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिल्याचे वॉचमन राख याने शिंदे यांना सांगितले. या प्रकरणातील 4 जण अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाचे व एक जण 30 ते 35 वर्षे वयाचा होता. ते सर्व पाचजण तेथून निघून गेल्यानंतर शिंदे यांनी लागलीच लॉजचे मालक संतोष लोमटे यांना फोनवरुन सदर घटनेची माहिती दिली. या प्रकारामुळे घातलेले लॉजचे मॅनेजर यांनी शनिवार, दि. 29 जुलै रोजी शहर पोलिस ठाण्यात अनोळखली पाच इसमांविरूद्ध दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजि.नं. कलम 395 अन्वये दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास अंबाजोगाई शहर पोलिस करीत आहेत.
COMMENTS