Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणतांब्यातील 17 कोटी रूपयांच्या पाणी योजनेतील त्रुटी दूर कराव्यात

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची मागणी

पुणतांबा प्रतिनिधीः गावाला वरदान ठरणार्‍या जलस्वराज्य टप्पा क्रमांक दोन 17 कोटी रुपयांच्या पाणी योजनेतील त्रुटी जीवन प्राधिकरणाने लवकरात लवकर दुर

जुनी गंगा जगदंबा देवी मंदिरालगतचा रस्ता खुला करा ः स्नेहलता कोल्हे
पंतप्रधानांनी बचत गटांची दखल घेणे अभिमानास्पद ः स्नेहलता कोल्हे
समृद्धी महामार्गामुळे देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न पूर्ण – स्नेहलता कोल्हे

पुणतांबा प्रतिनिधीः गावाला वरदान ठरणार्‍या जलस्वराज्य टप्पा क्रमांक दोन 17 कोटी रुपयांच्या पाणी योजनेतील त्रुटी जीवन प्राधिकरणाने लवकरात लवकर दुरुस्त कराव्यात याबाबत जीवन प्राधिकरणाला लेखी पत्र देणार असल्याचे महाराष्ट्र राज्य भाजपच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता ताई कोल्हे यांनी सांगितले.
पुणतांब्याचा पाणी प्रश्‍न जिव्हाळ्याचा असून पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी साडे सतरा कोटी रुपयांची पाणी योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून ती मंजूर करून आणली व योजनेसाठी जागा देखील मिळवली गेल्या चार ते पाच वर्षांपासून या योजनेचे काम सुरू असून या योजनेत अनेक त्रुटी राहिले आहे याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी आपणाकडे आल्या त्यानुसार जीवन प्राधिकरणाला या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी लेखी पत्र देऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले. या योजनेतील त्रुटी बाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामसभेत देखील आवाज उठवून जीवन प्राधिकरण असे लक्षवेधी मात्र जीवन प्राधिकरणाकडे याकडे दुर्लक्ष करून पुणतांबेकर यांना आश्‍वासनावरच झुरत ठेवले त्यामुळे ग्रामस्थ नाराजी असून जीवन प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीबाबत संतप्त भावना असून त्याबाबत जीवन प्राधिकरणाला जाब विचारणार असल्याचे माजी आमदार कोल्हे यांनी सांगितले. पुणतांब्यात एका कार्यक्रमात माजी आमदार कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर असून त्या तक्रार यांची दखल जीवन प्राधिकरणाने घ्यावी तसेच पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी मिटवावा ही भूमिका आपली राहिली असून या योजनेतील त्रुटी दुरुस्त झाल्याशिवाय ग्रामपंचायत योजना ताब्यात घेऊ नये, अशी मागणी कोल्हे यांनी केली.

COMMENTS