नाशिक प्रतिनिधी - आपल्या विविध मागण्यांसाठी काल नाशिकच्या दिंडोरी होऊन निघालेला लॉंग मार्च नाशिक मध्ये दाखल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काल र
नाशिक प्रतिनिधी – आपल्या विविध मागण्यांसाठी काल नाशिकच्या दिंडोरी होऊन निघालेला लॉंग मार्च नाशिक मध्ये दाखल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काल रात्री नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मात्र या बैठकीत तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच राहील, अशी माहिती माजी आमदार जे. पी. गावित आणि अजित नवले यांनी दिली. आज नाशिकहून हे लाल वादळ मुंबईच्या दिशेने पुन्हा एकदा निघाले आहे. येत्या दोन दिवसात या मागणी संदर्भात तोडगा काढू, अशा पद्धतीचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे हा लाँग मार्च थांबतो का, मुंबईपर्यंत जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी लाल वादळ मुंबईच्या दिशेने निघाले आहे. 15 हजार शेतकरी बांधव या लॉंग मार्च मध्ये सहभागी झाले आहेत. काल पालकमंत्री दादा भुसे यांच्या सोबत झालेली बैठक निष्फळ ठरली. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात. जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत मोर्चा स्थगित होणार नाही, असा इशारा मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी आमदार जे. पी. गावित यांनी दिला आहे.
COMMENTS