Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आपल्या विकासासाठी चर्मकार संघाने एकत्र आलं पाहिजे-बबनराव घोलप

चांदवड :- राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक तथा माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी आज चांदवड येथे चांदवड तालुका चर्मकार संघाच्या मेळाव्य

  चालत्या एक्सप्रेसवर दगड मारल्याने महिला जखमी 
नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांना लोकनेता म्हणत सन्मान
व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून 23 वर्षीय तरुणाचा गळफास | LOKNews24

चांदवड :- राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक तथा माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी आज चांदवड येथे चांदवड तालुका चर्मकार संघाच्या मेळाव्यात चर्मकार समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी आणि विकासासाठी एकत्र आले पाहिजे असे प्रतिपादन केले. त्या आधी त्यांनी महादेवाचे आणि शनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले,

      दिनांक २५ जून २०२४ रोजी चांदवड तालुका चर्मकार महासंघाचा मेळावा शनी मंदिर परिसरातील हॉल मध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक तथा माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी पुढे असे सांगितले कि, चर्मकार समाजातील प्रत्येक नागरिकाने उच्च शिक्षण घेतले पाहिजे, नोकरीपेक्षा व्यवसायात उतरून स्वताची ओळख निर्माण केली पाहिजे. यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ समाजातील प्रत्येकच्या पाठीशी उभा राहील. समाजासाठी असलेल्या वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे यासाठी महासंघ नक्की मदत करेल.

       मेळाव्यास राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय सचिव श्री दत्तात्रेय गीतीसे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री. दिलीपभाऊ कानडे, उपाध्यक्ष श्री. शैलेश सोनवणे, नाशिक जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष श्री प्रदीप अहिरे उपस्थित होते.

        मेळाव्यात चांदवड तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली त्यात अध्यक्ष मनोहर धर्मा अहिरे, कार्याध्यक्ष प्रभाकर घोलप, सचिन बाळासाहेव धाकराव, सल्लागार विजय धाकराव, चांदवड शहर अध्यक्ष जयेश पारवे, कार्याध्यक्ष श्रीकांत वाघ, सचिव कृष्णा बडोदे, सल्लागार गोपी बडोदे तर युवा अध्यक्ष म्हणून भाऊसाहेब पठाडे, कार्याध्यक्ष गोरख साळी सचिव अनिकेत भोळे सहसचिव ओंकार धाकराव आणि इतर सदस्य आदींची नावाची घोषणा करून त्यांना नियुक्त पत्र नानांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय धाकराव, सोमनाथ धाकराव, विठ्ठल घोलप, दादाभाऊ अहिरे, भाऊसाहेब सोनावणे, गोरखा वेताळ, रघुनाथ भोळे, राहूल गोविंद, काशिनाथ घोलप, सुभाष कांबळे, संतोष ठाकरे, सागर अहिरे, नितीन फांगळ, सागर बडोदे, ताराचंद बडोदे, गोपाळ पारवे, सुधीर पारवे, पावर्ताबाई पारवे, कांताबाई बडोदे, प्रमिलाबाई बडोदे, शिल्पा पारवे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब धाकराव यांनी केले तर आभार गोपी बडोदे यांनी मानले.

COMMENTS