Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोयता गँगच्या म्होरक्याला पोलिसांनी ठोकल्या बेडया

पुणे पोलिसांची धडक कारवाई

पुणे/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगेने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या गँगला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पुणे पोलिसांसम

डोक्यात दांडा मारून एकाचा खून
धरणांतील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा
टीएएस महाराष्ट्र शाखेच्‍या वतीने सिनर्जी २०२४ राष्ट्रीय परीषदेचे आयोजन 

पुणे/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगेने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या गँगला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पुणे पोलिसांसमोर होते. शिक्षणाचे माहेरघर पुणे शहर हे गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या विविध घटनांनी हादरले आहे. पुणे शहरात कोयता घेऊन लोकांमध्ये दहशत माजवणार्‍या ‘कोयता गँग’ने गेले काही दिवस उच्छाद मांडला आहे. कोयता गँगने पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून पुण्यातील कोयता गँगच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शहरात विविध भागांत कोम्बिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले असून कोयता गँगविरोधात मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईअंतर्गत शहरातील गंभीर गुन्ह्यातील फरार, तडीपार तसेच मोक्कामधील फरार आरोपी, कोयता गँगद्वारे दहशत माजवणारे यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. डायस प्लॉट येथील सराईत गुन्हेगाराकडून पोलिसांनी तब्बल 9 कोयते हस्तगत केले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्वारगेट पोस्ट येथील गुन्हेगार अक्षय अप्पया कांबळे याला अटक केली आहे. अक्षय कांबळेकडून पोलिसांनी 9 कोयते जप्त केले आहे. पुणे शहरात कोयता गँगकडून दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करणे, जाळपोळ करणे यासारखे प्रकार केले जात आहेत. या गुन्हेगारी कृत्यामध्ये शहरातील अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग असल्याने चिंतेची बाब मानली जात आहे. यासोबत पैसे न देता जेवण, कपडे किंवा अन्य गोष्टी मिळवण्यासाठी गुन्हेगारांकडून दुकानदारांना कोयत्याची दहशत दाखवली जात आहे. यामुळे शहरातील नागरिकांसह व्यावसायिकांमध्येही कोयता गँगची दहशत निर्माण झाली आहे. विधिमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील कोयता गँगच्या दहशतीचा मुद्दा उपस्थित केला होता. कोयता गँगची दहशत रोखण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली होती. काही दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड रस्त्यावर कोयता घेऊन दहशत पसरवणार्‍या एका आरोपीला दोन पोलिसांनी चांगलाच चोप दिला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सिंहगड रस्त्यावरील खाऊ गल्लीत कोयते उगारुन दहशत माजविणार्‍या सराईत गुन्हेगारांना चोप देणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांचा पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सत्कार केला होता. पोलिस आयुक्तांकडून पोलीस कर्मचारी अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

COMMENTS